शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मिरचीच्या शेतात सोडली जनावरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 10:47 IST

यावर्षी हिरव्या मिरचीला अत्यल्प भाव मिळत असून तोडणीचाही खर्च शेतकऱ्यांना परवडण्यासारखा नाही. त्यामुळे शेतकरी हतबल झाला असून अशात उभ्या मिरचीमध्ये जनावरे सोडण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नाही. हे वास्तवचित्र सध्या मौदा तालुक्यात जागोजागी पहावयास मिळत आहे.

ठळक मुद्देमौदा तालुक्यातील प्रकार अत्यल्प भाव, तोडणीचाही खर्च परवडत नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: मिरचीसाठी ओळखल्या जाणाऱ्या भिवापूर तालुक्यासह कुही, मौदा, रामटेक तालुक्यातही मिरचीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मात्र यावर्षी हिरव्या मिरचीला अत्यल्प भाव मिळत असून तोडणीचाही खर्च शेतकऱ्यांना परवडण्यासारखा नाही. त्यामुळे शेतकरी हतबल झाला असून अशात उभ्या मिरचीमध्ये जनावरे सोडण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नाही. हे वास्तवचित्र सध्या मौदा तालुक्यात जागोजागी पहावयास मिळत आहे.भिवापूर, कुही तालुक्यानंतर मिरचीची लागवड करणारा तालुका म्हणून मौदा तालुक्याचा क्रमांक आहे. सध्या हिरव्या मिरचीची तोडाई सुरू आहे. मात्र मिरचीला अत्यल्प भाव असल्याने शेतकऱ्यांना तोडणीचा खर्चही भरून निघणे कठीण झाले आहे. हिरव्या मिरचीला बाजारात १० ते १३ रुपये प्रतिकिलो याप्रमाणे भाव मिळत आहे. मिरची तोडाईच्या खर्चाकडे लक्ष दिल्यास ४० ते ४५ किलो मिरची तोडायला दोन मजुरांची गरज पडते. एका मजुराची रोजी ही १२० ते १५० याप्रमाणे ३०० रुपयांपर्यंत मजुरी होते. ती मिरची बाजारापर्यंत पाठविण्याचा वाहतूक खर्च हा १५० ते २०० रुपये येतो. त्यामुळे तोडलेली मिरची विकण्यास पाठविली तर शेतकऱ्यांकडील ५० रुपये अतिरिक्त खर्च होतात. हा हिशेब पाहता शेतकऱ्यांनी आता उभ्या मिरचीमध्ये जनावरांना सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मिरचीसोबतच भाजीपाल्याचे भाव पडल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.

टॅग्स :agricultureशेती