शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दृष्टिहीन अनिकेतच्या स्वरलहरीने दुबई जिंकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 10:02 IST

अंधार असला तरी सप्तसुरांवर मिळविलेल्या कौशल्याचा ठसा त्याने देशाबाहेर उमटवला. दुबई येथे झालेल्या सांस्कृतिक समारोहात त्याने सुवर्णझेप घेतली. ही यशोगाथा आहे नागपूरच्या अनिकेत बेंडे या विद्यार्थ्यांची.

ठळक मुद्देबहुभाषीय संगीत, सांस्कृतिक महोत्सवात सुवर्ण दहावी, बारावीतही होता टॉपर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : समुद्रातील पाणी डोळ्यात गेल्याचे निमित्त झाले आणि स्टीव्हन जॉन सिन्ड्रोम नावाच्या दुर्मिळ आजाराने वयाच्या पाचव्या वर्षी त्याला काळोखात लोटले. नियतीने त्याच्यावर आघात केला पण काळोखाआड पाहिलेल्या स्वप्नांचा पाठलाग करणे त्याने सोडले नाही. अंधार असला तरी प्रकाश वेचण्याची जिद्द आणि त्यातून सप्तसुरांवर मिळविलेल्या कौशल्याचा ठसा त्याने देशाबाहेर उमटवला. नुकत्याच दुबई येथे झालेल्या बहुभाषीय संगीत, सांस्कृतिक समारोहात शंभरावर देशातील ८०० विद्यार्थ्यांमधून त्याने सुवर्णझेप घेतली. ही यशोगाथा आहे नागपूरच्या अनिकेत बेंडे या विद्यार्थ्यांची.विशेष म्हणजे मागील वर्षी श्रीलंकेत झालेल्या याच आंतरराष्ट्रीय संगीत महोत्सवात त्याने सुवर्ण पदकाची कमाई केली होती. हे अनिकेतने मिळवलेले पहिलेच यश नाही. याच अनिकेतने दहावीच्या परीक्षेत दृष्टिहीन गटातून राज्यात पहिला क्रमांक आणि पुढे बारावीच्या परीक्षेतही इंग्रजी माध्यमातून कला शाखेत ८८ टक्के गुण घेऊन त्याने राज्यात बाजी मारली होती. तो सध्या पुण्यात बी.ए. च्या अंतिम वर्षाला आहे. अनिकेतला लहानपणापासून संगीताची आवड आहे. किंबहुना याच सप्तसुरांच्या सोबतीने त्याच्या अंधारलेल्या आयुष्याला प्रकाशाची दिशा मिळाली आहे. सुरांच्या साथीने त्याला शिक्षणात यश मिळत गेले. ऐकता ऐकता हे संगीत तो स्वत: कुठेही न शिकता आत्मसातही करू लागला. त्याच्या गळ्यातून आणि हाताबोटातून हे स्वर घुमू लागले.आज एखाद्या प्रशिक्षित विद्यार्थ्यासारखा तो हे संगीत स्वत: कंपोज करतो, लिहितो आणि गातोही. अखिल भारतीय कला व सांस्कृतिक संघ, पुणेतर्फे त्याला श्रीलंका व दुबई येथे आंतरराष्ट्रीय महोत्सवात सादरीकरण करण्याची संधी मिळाली व त्याने संधीचे सोने केले. अनिकेतने वाद्य गटात सुवर्ण तर गायनात रजत पदक प्राप्त केले.

आयएएस अधिकारी होण्याची इच्छाअनिकेत दृष्टिहीन असला तरी त्याची इच्छाशक्ती व आत्मविश्वास मोठा आहे. संगीतात प्राविण्य मिळवित असला तरी त्याची आयएएस अधिकारी होण्याची इच्छा आहे व यासाठी त्याने आतापासून तयारीही सुरू केली आहे. डोळसांनाही हेवा वाटावा अशीच त्याची जिद्द आहे.

टॅग्स :cultureसांस्कृतिक