शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त नागरिकांनी केला रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 02:17 IST

भांडण सोडविण्यास गेलेल्या व्यक्तीला जबर मारहाण केली. त्यात जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाला.

ठळक मुद्देरमेश मेश्राम खूनप्रकरण : आरोपीच्या अटकेची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणा : भांडण सोडविण्यास गेलेल्या व्यक्तीला जबर मारहाण केली. त्यात जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी संतप्त जमावाने मृतदेह रस्त्यात ठेवून रास्तारोको केला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.रमेश बाबुलाल मेश्राम (४६, रा. राजीवनगर) असे मृताचे नाव आहे. २९ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास राजीवनगर परिसरात अण्णा चायनीज ठेल्यावर सोनू अजय शहा, रितेश सिंह यांच्यासह अन्य दोन विधिसंघर्ष ग्रस्त बालकांनी नाश्ता केला. नाश्त्याचे पैसे मागताच त्यांनी ठेला मालक अण्णा जेना आणि त्याच्या पत्नीला शिवीगाळ करीत मारहाण करायला लागले.दरम्यान भांडण सोडविण्यासाठी रमेश मेश्राम यांनी मध्यस्थी केली. त्यामुळे आरोपींनी रमेश यांना बेदम मारहाण केली. त्यात ते गंभीररीत्या जखमी झाले. त्यांना लगेच नागपुरातील खासगी हॉस्पिटलमध्ये भरती केले. तेथे उपचारादम्यान ३ आॅगस्टला मृत्यू झाला. या प्रकरणी एमआायडीसी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तीन आरोपींना गुरुवारीच अटक केली.दरम्यान, शुक्रवारी उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांकडे सोपविण्यात आला. मृतदेह राजीवनगर येथे आणल्यानंतर संतप्त नागरिकांनी हिंगणा मार्गावर मृतदेह ठेवून रास्तारोको आंदोलन केले.या घटनेतील फरार आरोपीला तात्काळ अटक करा, परिसरात सुरू असलेले अवैध धंदे, अवैध दारुविक्री बंद करा, अशी मागणी त्यांनी केली. तब्बल दोन तास रास्तारोको आंदोलन चालले.याबाबत पोलिसांना माहिती होताच त्यांनी घटनास्थळ गाठून आंदोलकांना शांत केले. आरोपीला लवकरच अटक करू, असे आश्वासन देण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. नंतर रमेशच्या पार्थिवावर वानाडोंगरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या खून प्रकरणात पोलिसांनी सोनू शहा याच्यासह दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले.