शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी सेविकांचे ‘माेबाईल फाेन’ आंदाेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:10 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : राज्य शासनाने अंगणवाडी सेविकांना माेबाईल फाेन दिले असून, त्यांना त्यांच्या कामाची सर्व माहिती ऑनलाईन ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : राज्य शासनाने अंगणवाडी सेविकांना माेबाईल फाेन दिले असून, त्यांना त्यांच्या कामाची सर्व माहिती ऑनलाईन नाेंदविण्याची सक्ती केली आहे. ते माेबाईल निकृष्ट प्रतीचे असल्याचा दावा करीत हाताळताना समस्या येत असल्याने अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी रामटेक येथील एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयासमाेर निदर्शने करीत माेबाईल फाेन परत करा आंदाेलन केले.

शासनाने दिलेले माेबाईल फाेन दाेन जीबी रॅमचे आहेत. त्यामुळे हे फाेन वारंवार हँग हाेतात व चार्जिंग करताना हा फाेन गरम होताे. या फाेनमध्ये वारंवार बिघाड निर्माण हाेत असल्याने ताे दुरुस्त करण्यासाठीही पदरमाेड करावी लागते. एका वेळचा दुरुस्ती खर्च हा दाेन ते चार हजार रुपये येताे. ग्रामीण भागात नेटवर्क समस्या असल्याने या माेबाईलवर माहिती अपलाेड करताना त्रास हाेताे. शासनाने दिलेले ॲप इंग्रजीत असल्याने ते हाताळतानाही त्रास हाेत असल्याची माहिती अंगणवाडी सेविकांनी दिली असून, ही समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी आंदाेलन करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या आंदाेलनात रामटेक तालुक्यातील १५० अंगणवाडी सेविका व मदतनीस सहभागी झाल्या हाेत्या. यात छबू गुरव, चंद्रशेखर शुक्ला, राजू शाहू, लीला मेहर, सुशीला बावनकर, सीमा बावनकुळे, सुनीता नेवारे, यशोदा पटले, कौतिका परतेती, दुर्गा गोस्वामी, सुनीता ढोक, सुजाता नागदिवे, शकुंतला लेंडे, वनिता चौकसे, शालू रामटेके, वसुधा बनाईत, किरण जयस्वाल, रंजना नागपूरकर यांच्यासह इतर अंगणवाडी सेविका व मदतनिसांचा समावेश हाेता.