शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
5
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
6
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
7
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
8
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
9
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
10
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
11
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
12
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
13
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
14
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
15
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
16
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
17
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
18
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
19
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
20
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब

अंगणवाडी सेविका उतरल्या रस्त्यावर

By admin | Updated: March 21, 2017 01:49 IST

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीसंदर्भात शासनाने नेमलेल्या समितीच्या शिफारशी लागू करण्यात याव्यात,...

आयटकने पुकारला ४८ तासाचा संप नागपूर : अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीसंदर्भात शासनाने नेमलेल्या समितीच्या शिफारशी लागू करण्यात याव्यात, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन(आयटक)ने ४८ तासाचा दिवस-रात्रीचा संप पुकारला आहे. या संपाच्या आवाहनानुसार शेकडो अंगणवाडी सेविकांनी सोमवारी संविधान चौकात दिवसभर आंदोलन करीत रात्रीचा मुक्काम केला. मंगळवारी पुन्हा दिवसभर आंदोलन करण्यात येणार आहे. शासनाने गठित केलेल्या या समितीच्या तीन बैठका मंत्रालयात पार पडल्या. यानंतर महिला व बालकल्याण विभागाच्या सचिव वनिता सिंगल यांनी शासनाला एक प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावामध्ये ३१ जानेवारी २०१६ पर्यंत सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांना महिना २ हजार रुपये वाढ देण्याचा प्रस्ताव आहे तसेच मदतनिसांना सेविकेच्या तुलनेत ७५ टक्के वाढ देण्यात यावी. महागाईवाढीचा आढावा घेऊन दरवर्षी ५ टक्के मानधन वाढ द्यावी. मिनी अंगणवाडी सेविकांना अंगणवाडी सेविकेप्रमाणे मानधन देण्यात यावे, यासोबतच अनेक शिफारशी करण्यात आलेल्या आहेत. या शिफारशी तात्काळ लागू कराव्यात आणि अर्थसंकल्पात तशी तरतूद करावी, अशी मागणी अंगणवाडी सेविकांनी केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास १ एप्रिलपासून बेमुदत संप सुरू होईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. आयटकचे सरचिटणीस श्यामजी काळे यांच्या नेतृत्वात पुकारण्यात आलेल्या या संपात जयश्री चहांदे, उषा चारभे, वनिता कापसे, रेखा कोहाड, ललिता कडू, शालिनी मुरारकर, मंगला नितनवरे, विद्या गजभिये, सीमा गजभिये, वीणा डोंगरे, मीना भिमटे, योगिता नवखरे, छाया पाटील आदींसह शेकडो अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या आहेत. (प्रतिनिधी)