शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

अन् मुत्तेमवार झाले पास

By admin | Updated: September 27, 2014 02:41 IST

निवडणुकीच्या धामधुमीत माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांना शुक्रवारी एका परीक्षेला सामोरा जावे लागले.

नागपूर : निवडणुकीच्या धामधुमीत माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांना शुक्रवारी एका परीक्षेला सामोरा जावे लागले. भल्याभल्यांना घाम आणणाऱ्या या परीक्षेत मुत्तेमवार यांनी चक्क १९ पैकी १७ गुण घेतले. शिकाऊ वाहन परवान्यासाठी आवश्यक असणारी ही संगणक चाचणी परीक्षा होती.मुत्तेमवार यांचा मोटार वाहन परवाना काही वर्षांपूर्वी गहाळ झाला. त्यांचा परवानाही फार जुना होता. आरटीओमध्ये त्या संदर्भातील दस्तावेज उपलब्ध नव्हते. शुक्रवारी ते १२.१५ वाजता कार्यालयात पोहचले. त्यांनी आधीच अधिकाऱ्यांना सामान्यांसोबत परवान्याची प्रक्रिया पूर्ण करणार असल्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ते शिकाऊ परवान्याच्या रांगेत लागले. शुल्क भरले. छायाचित्र काढून घेतले. त्यानंतर वाहतूक नियमांवर आधारित ते संगणक चाचणी परीक्षेला बसले. यावेळी त्यांच्यासह ३० उमेदवार परीक्षा देत होते. इकडे, २० प्रश्नाच्या परीक्षेत मुत्तेमवार यांना १९ प्रश्नांचीच उत्तरे देता आली. शेवटच्या प्रश्नावर संगणकाच्या बटनामध्ये बिघाड आला होता. अखेर निकाल हातात आला. मुत्तेमवार यांनी १९ पैकी १७ प्रश्नांची अचूक उत्तरे दिल्याचे जाहीर केले. याची बातमी बाहेर येताच ताटकळत उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून अभिनंदन केले. मुत्तेमवार यांनी व्हीआयपी ट्रीटमेंट न घेता सामान्यांसारखे वाहन परवाना काढल्याने आज दिवसभर आरटीओत चर्चा होती. मुत्तेमवार यांनीही आरटीओच्या या प्रणालीचे कौतुक केले. (प्रतिनिधी)