शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

... अन् सन्मानाने सुरू होतो महाप्रवास!

By admin | Updated: February 20, 2017 01:59 IST

आयुष्याचा अंतिम क्षण गोेड व्हावा, अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. परंतु असे भाग्य सगळ्यांनाच लाभत नाही.

मुस्लीम बांधवांचे औदार्य : वर्षभरात २० बेवारस मृतदेहांचा केला दफनविधीदयानंद पाईकराव नागपूरआयुष्याचा अंतिम क्षण गोेड व्हावा, अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. परंतु असे भाग्य सगळ्यांनाच लाभत नाही. बेवारस स्थितीत जीव सोडणाऱ्या अनेकांना तर आपल्या धर्मानुसार अंतिम संस्कारही लाभत नाहीत. मुस्लीम समाजातील अशा दुर्दैवी जीवांना सन्मानाने निरोप देण्याचे काम मोमिनपुरा येथील कब्रस्तान कमिटीचे सदस्य इमानेइतबारे करीत आहेत. या कमिटीने मागील वर्षभरात २० अनोळखी मुस्लीम बांधवांचा दफनविधी केला आहे. अनोळखी मृतदेहाची माहिती अनेकदा दोन-तीन दिवसानंतर दुर्गंधी सुटली की होते. अशा वेळी पोलीसही नाकाला रुमाल बांधून त्या मृतदेहाला शवविच्छेदनासाठी नेणे, त्यानंतर अंत्यसंस्कार पार पाडणे ही कामे करतात. परंतु यात मृतदेहाची दुर्गंधी येत असल्यामुळे जिव्हाळा उरत नाही. परंतु कब्रस्तान कमिटी मोमिनपुराने रेल्वेस्थानकावरील अनोळखी मुस्लीम बांधवांचा दफनविधी पार पाडण्याचा विडाच उचलला आहे. लोहमार्ग पोलिसांकडून अनोळखी मुस्लीम बांधवाचा मृतदेह असल्याचे पत्र मिळाल्यानंतर कमेटीचे सदस्य आपले तीन प्रतिनिधी पाठवून संबंधित मृतदेह मुस्लीम व्यक्तीचा आहे की नाही, याची खात्री करतात. खात्री पटल्यानंतर दुपारी मस्जिदमध्ये नमाद अदा करण्यापूर्वी तेथे उपस्थित मुस्लिम बांधवांना आपल्या एका अनोळखी मुस्लीम बांधवाचा दफनविधी करावयाचा असल्याचे आवाहन करतात. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन २५ ते ३० मुस्लीम बांधव माणुसकीच्या नात्याने आणि घरातील सदस्याप्रमाणे मृतदेह शवविच्छेदनानंतर घेऊन जाणे, मृतदेहाला सुगंधी अत्तर लावून आंघोळ घालणे, नमाज अदा केल्यावर सन्मानाने त्या मृतदेहाचा दफनविधी करण्यात येतो. मागील वर्षभरात नागपूर रेल्वेस्थानकावर लोहमार्ग पोलिसांना १२० मृतदेह आढळले. यातील २० मृतदेह हे मुस्लीम समाजातील अनोळखी व्यक्तीचे होते. मोमिनपुरा कब्रस्तान कमिटीतर्फे करण्यात येणारे हे कार्य खरोखरच पुण्याचे असून इतरांनीही यापासून आदर्श घेण्याची गरज आहे. ‘कुठल्याही जाती, धर्मातील मृत व्यक्ती असो, त्याचा अंत्यविधी सन्मानाने होण्याची गरज आहे. मोमिनपुरा कब्रस्तान कमिटीला आम्ही पत्रव्यवहार केल्यानंतर ते त्वरित प्रतिसाद देऊन संबंधित अनोळखी मृतदेहावर त्यांच्या धार्मिक विधीनुसार अंत्यसंस्कार करतात.’-अभय पान्हेकर, लोहमार्ग पोलीस निरीक्षक, नागपूर