शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

अन् जीव भांड्यात पडला

By admin | Updated: July 1, 2016 02:50 IST

शालेय सत्राच्या तिसऱ्याच दिवशी बालिकेचे अपहरण झाल्याची शंका आल्याने पालकांसह पोलीसही अस्वस्थ झाले.

बालिकेच्या अपहरणाच्या शंकेने पालक, पोलिसांची धावपळनागपूर : शालेय सत्राच्या तिसऱ्याच दिवशी बालिकेचे अपहरण झाल्याची शंका आल्याने पालकांसह पोलीसही अस्वस्थ झाले. हादरलेले पोलीस तिची शोधाशोध करू लागले. दोन तासातच ती आढळली अन् तिला पाहून पालकांसह पोलिसांचाही जीव भांड्यात पडला.वेदिका नरेंद्र गौर (वय ९ वर्षे) हिच्या कथित अपहरणाचा हा किस्सा आहे. धरमपेठच्या आदर्श शाळेत चौथीत शिकणारी वेदिका बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे काचीपुऱ्यातून पायीच शाळेला गेली. सकाळी ११ वाजता शाळा सुटली. मात्र, १२ वाजले तरी ती घरी पोहचली नाही. त्यामुळे पालकांनी तिच्या शाळेत जाऊन पाहिले. ती दिसली नाही. पुन्हा घरी आले. ती घरी पोहचलीच नव्हती. वेदिकाच्या वर्गमैत्रिणींकडे विचारणा केली असता ‘ती शाळेत आली होती. सुटी झाल्यानंतर घराकडे निघाली. कुठे गेली ते माहीत नाही’, असे तिच्या मैत्रिणींनी सांगितले. परिणामी वेदिकाच्या पालकांच्या काळजाचा ठोका चुकला. तिला पळवून नेले असावे, अशी शंका घेत त्यांनी दुपारी २.३० वाजता सीताबर्डी पोलीस ठाणे गाठले. वेदिकाच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवून तिच्या अपहरणाचा संशय तक्रारीत व्यक्त केला.शालेय सत्र सुरू होऊन अवघे तीन दिवस झाले असताना शाळकरी मुलीच्या अपहरणाची तक्रार आल्याने पोलीसही हादरले. ठाणेदार सत्यवीर बंडीवार यांनी लगेच वेदिकाला शोधून काढण्याचे आदेश दिले. त्यानुसार, पोलीस उपनिरीक्षक अरुण नागरे यांनी गुन्हा दाखल केला. पीएसआय पवार, पीएसआय शेजव यांच्या नेतृत्वात दोन वेगवेगळी पथके वेदिकाला शोधू लागली. एक शोधपथक दुपारी ३.३० च्या सुमारास शाळेच्या आवारात चौकशीला गेले. अन्...शाळेच्या आवारात वेदिका आढळली. ती सुखरूप होती. कुठेच गेली नव्हती अन् अपहरणाचा तर प्रश्नच नव्हता. तिला निरागसपणे शिक्षिकेसोबत गप्ता मारताना पाहून आईने लगेच आपल्या पदरात घेतले. तिचे लाडकौतुक केले. आईवडील, पोलिसांचा ताफा पाहून शाळेत कुजबूज वाढली. काय झाले, अशी विचारणा होऊ लागली. वेदिकाच्या अपहरणाची शंका आल्याने पोलीस तिची शोधाशोध करीत होते, असे कळाल्याने सर्वच अचंबित झाले. (प्रतिनिधी)समुपदेशन ्अन् घरवापसी सीताबर्डी पोलिसांनी दुपारी ४ च्या सुमारास वेदिकाला तिच्या आईवडिलांच्या स्वाधीन केले. तत्पूर्वी, कुणा अनोळखी व्यक्तीने काही दिल्यास काही घ्यायचे नाही, त्या व्यक्तीसोबत जायचे नाही, वेदिकाचे समुपदेशन करण्यात आले. हो, हो करीत तिनेही पोलिसांचा निरोप घेतला.