शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

अन् दुर्घटना टळली

By admin | Updated: June 19, 2017 02:23 IST

अजनी लोकोशेडमध्ये कार्य निरीक्षकामुळे तरुण कर्मचाऱ्याला जीव गमवावा लागल्याच्या घटनेपासून रेल्वे प्रशासनाने कोणताही धडा घेतलेला नाही.

रेल्वे रुळाजवळील क्रेनचा खांब झाला तिरपालोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अजनी लोकोशेडमध्ये कार्य निरीक्षकामुळे तरुण कर्मचाऱ्याला जीव गमवावा लागल्याच्या घटनेपासून रेल्वे प्रशासनाने कोणताही धडा घेतलेला नाही. नागपूर रेल्वेस्थानकाजवळ रेल्वे रुळाशेजारील क्रेनचा बूम तिरपा झाला. जर हा बूम रेल्वे रुळाच्या दिशेने असता आणि तेथून रेल्वेगाडी जात असती तर मोठी दुर्घटना घडली असती. कंत्राटदाराला दिलेले काम शुक्रवारीच पूर्ण झाल्यामुळे आमचा या घटनेशी काहीच संबंध नसल्याचे सांगून रेल्वे प्रशासनाने या घटनेबाबत हात वर केले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, नॅरोगेज लाईनचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यात येत असल्यामुळे नागपूर रेल्वेस्थानकावर डायमंड क्रॉसिंगच्या जवळून जाणारी नॅरोगेज लाईन बंद करण्यात आली आहे. या लाईनवर ब्रॉडगेज लाईन जाते. ही लाईन लोखंडी पुलाच्या स्ट्रक्चरवर टाकण्यात आली आहे. नॅरोगेज लाईन बंद झाल्यामुळे लोखंडी पुलाच्या ठिकाणी पक्का पूल बनविण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी लोखंडाचा पूल हटविण्याचे काम मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने दोन दिवसात पूर्ण केले. हे काम पाहणाऱ्या कंत्राटदार कंपनी व्ही. एस. क्रेन्स अ‍ॅन्ड मुव्हर्सच्या दोन क्रेन कामाला लावण्यात आल्या होत्या. त्यांनी हे काम शुक्रवारी रात्री पूर्ण केले. लोखंडाच्या पुलाचे निघालेले लोखंड रेल्वे रुळाच्या जवळच ठेवण्यात आले आहे. प्रत्यक्षदर्शींच्या मते, आज या स्ट्रक्चरला हटविताना एका क्रेनचा बूम तिरपा झाला. यावेळी ही क्रेन रेल्वे रुळाच्या अतिशय जवळ होती. जर क्रेनच्या बूमची दिशा रेल्वे रुळाकडे असती आणि तेथून रेल्वेगाडी जात असती तर मोठी दुर्घटना घडली असती. याबाबत मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील यांच्या मते, लोखंडाच्या पुलाचे लोखंड काढण्याचे काम ब्लॉक घेऊन कालच पूर्ण करण्यात आले. अशात जर कंत्राटदाराच्या क्रेनसोबत काही घटना घडली असेल तर त्याचा रेल्वे प्रशासनाशी काही संबंध नाही. त्यांनी लोकमतच्या छायाचित्रकारासोबत कंत्राटदार विक्रम सोखी यांनी केलेल्या उद्धटपणाच्या वागणुकीबद्दल मौन पाळले.छायाचित्रकाराची कॉलर पकडून हिसकावला कॅमेरानागपूर रेल्वेस्थानकाजवळ कंत्राटदार व्ही. एस. क्रेन्स अ‍ॅन्ड मुव्हर्सच्या क्रेनचा बूम तिरपा झाल्याची घटना माहीत होताच या घटनेचा फोटो घेण्यासाठी लोकमतचे छायाचित्रकार संजय लचुरिया घटनास्थळी पोहोचले. ते क्रेनचा फोटो घेत असताना कंत्राटदार विक्रम सोखी याने त्यांची कॉलर पकडून कॅमेरा हिसकावला. येथून निघून जा अन्यथा दुष्परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही या कंत्राटदाराने संबंधित छायाचित्रकाराला दिली.