शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

देशात अराजकता, संघर्ष अटळ

By admin | Updated: April 14, 2017 03:03 IST

देशात एका विशिष्ट विचारसरणीला पुरस्कृत करण्यात येत आहे. यामुळे देशातील गरीब, पीडित, दलित, आदिवासी, मुस्लीम ह्या समुदायामध्ये भीती आहे.

कन्हैयाकुमार : ‘बिहार से तिहार’ मराठी अनुवादित पुस्तकाचे प्रकाशननागपूर : देशात एका विशिष्ट विचारसरणीला पुरस्कृत करण्यात येत आहे. यामुळे देशातील गरीब, पीडित, दलित, आदिवासी, मुस्लीम ह्या समुदायामध्ये भीती आहे. परंतु या विचारसरणीला लढा देण्यासाठी वैचारिक संघर्ष यापुढे सातत्याने होणार आहे. देशातील अराजकतेविरुद्ध संघर्ष अटळ असल्याचा इशारा जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैयाकुमार यांनी नागपुरात दिला. अखिल भारतीय प्रगतिशील लेखक संघ, लोकवाङ्मय गृह आणि आयटकतर्फे आयोजित कन्हैयाकुमारने लिहिलेल्या ‘बिहार से तिहार’ पुस्तकाचे सुधाकर शेंडगे यांनी मराठीत केलेल्या अनुवादाचे प्रकाशन गुरुवारी कन्हैयाकुमार यांच्या उपस्थितीत धनवटे कॉलेजच्या सभागृहात करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. हरिभाऊ केदार, आयटकचे श्याम काळे, संगीता महाजन उपस्थित होते. यावेळी कन्हैयाकुमार पुस्तकासंदर्भात बोलले की, मी लेखक नाही आणि यापुढे पुस्तकही लिहिणार नाही. माझी ही आत्मकथाही नाही. मात्र माझा जो संघर्ष आहे त्याचे संक्षिप्त विवरण या पुस्तकात आहे. अनेकांना कन्हैयाकुमार माहिती नाही, त्यांना कन्हैयाकुमार कळावे, त्यामुळे माझा इतिहास या पुस्तकातून मांडला आहे. या समाजात जे समता, लोकतंत्र व न्यायासाठी संघर्ष करीत आहे, त्यांना माझे पुस्तक समर्पित आहे. पुस्तकातून क्रांती होईल, ही माझी अपेक्षा नाही, परंतु बरेच काही होईल, हा विश्वास आहे. माझ्याबद्दल समाजात जे भ्रम पसरविले आहे, या पुस्तकातून ते दूर होणार आहे. याप्रसंगी बोलताना डॉ. यशवंत मनोहर म्हणाले की, परिवर्तनवादी देशात समाजाचे विघटन झाले आहे. समाज वेगवेगळ्या फळ्यांमध्ये विभागला आहे. हुकूमशाहीचे आगमन होत आहे. देशात धर्मांधतेचे वातावरण निर्माण होत आहे. या गोष्टी अशक्य करायच्या असतील तर एक पावनखिंड लढवावी लागले. त्यासाठी गटातटाच्या लोकांना एकत्र यावे लागेल. या पुस्तकातून कन्हैयाकुमारसारख्या तरुण लेखकाने व्यवस्था परिवर्तनाचा संदेश दिला आहे. परिवर्तन आणायचे असेल तर स्वत:मध्ये परिवर्तन घडवून आणा, पुनर्रचना करा आणि क्रांतीशी हातमिळवणी करा, असे पुस्तकातून कन्हैयाकुमार सांगतो आहे. याप्रसंगी प्रा. हरिभाऊ केदार म्हणाले की, कन्हैयाकुमार यांनी या पुस्तकातून देशाला परिवर्तनाची दिशा दिली आहे. (प्रतिनिधी)