शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शहीद हेमंत करकरे यांच्या संदर्भातील वक्तव्यावरून विजय वडेट्टीवारांविरोधात अदखलपात्र गुन्हा

By योगेश पांडे | Updated: May 10, 2024 23:59 IST

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: काँग्रेसचे नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शहीद आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांच्यासंदर्भात ...

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: काँग्रेसचे नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शहीद आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून राजकारण तापलेलेच असताना पोलिसांनी त्यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. सीताबर्डी पोलीस ठाण्यात वडेट्टीवार यांच्याविरुद्ध लोकप्रतिनिधी कायद्यांतर्गत हा अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. भाजपतर्फे पोलीस ठाणे व निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती.

भाजपच्या विधि सेलचे महानगर अध्यक्ष ॲड. परीक्षित गजानन मोहिते यांनी मागील आठवड्यात तक्रार केली. तक्रारीनुसार वडेट्टीवार यांनी करकरे यांच्या मृत्युमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपचा हात असल्याचा आरोप केला होता. भाजप व भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम देशद्रोही असल्याचा आरोपदेखील वडेट्टीवार यांनी केला. वडेट्टीवार यांनी असे वक्तव्य करून आचारसंहितेचा भंग केला असून, समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. विजय वडेट्टीवार यांचे वक्तव्य तथ्यहीन असून, न्यायालयाचादेखील अवमान करणारे आहे अशी भूमिका भाजपकडून घेण्यात आली होती. भाजपकडून निवडणूक आयोगातदेखील तक्रार दाखल करण्यात आली होती. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संजय बोकाडे यांनी वडेड्डीवार यांच्या विरोधात सीताबर्डी पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्याआधारे पोलिसांनी वडेट्टीवार यांच्याविरुद्ध लोकप्रतिनिधी कायद्यांतर्गत अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवार