शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

आंबा उत्पादनातून वर्षाकाठी दहा लाख रुपयांचे उत्पन्न; नोकरीच्या मागे न लागता उच्चशिक्षिताने केली किमया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2023 19:55 IST

Nagpur News तुमसर तालुक्यातील चांदपूर येथील शेतकरी दिलीप लांजे हे उच्चशिक्षित असूनही त्यांनी नोकरीच्या मागे न लागता शेती करण्याचा निर्णय घेतला. ते आज वर्षाला १० लाख रुपयांचे उत्पन्न घेत आहेत.

नागपूर : तुमसर तालुक्यातील चांदपूर येथील शेतकरी दिलीप लांजे हे उच्चशिक्षित असूनही त्यांनी नोकरीच्या मागे न लागता शेती करण्याचा निर्णय घेतला. फळबाग शेतीचे महत्त्व ओळखून त्यांनी आपल्या पाच एकर शेतात आंबा लागवड केली आहे. यातून ते आज वर्षाला १० लाख रुपयांचे उत्पन्न घेत आहेत.

लांजे यांच्याकडे १७ एकर शेती आहे. त्यातील पाच एकरमध्ये ते लंगडा व दशेरी या जातीचे आंबे पिकवितात. याशिवाय त्यांच्या शेतामध्ये चवसा, केशर, फजली, तोतापली अशी वेगवेगळ्या जातीची जवळपास २२५ आंब्यांची झाडे लावली आहेत.

कृषी विभागाच्या वतीने आंबामहोत्सवाचे आयोजन जुने प्रशासकीय भवन येथे करण्यात आले. ‘विदर्भाचा राजा चांदपूरचा लंगडा’ आंबा शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे. हा आंबा अतिशय वाजवी दरामध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. १५ जूनपर्यंत या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी या महोत्सवाचे आयोजन केले जाते.

उपन्न वाढविण्यासाठी पारंपरिक शेती पद्धतीच्या मागे न लागता शेतकऱ्यांनी प्रयोगशील असणे गरजेचे आहे. अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी फळबाग शेती करून उत्पन्नाचे आर्थिक स्त्रोत मजबूत करणे शक्य असल्याचे लांजे म्हणाले.

नैसर्गिक पद्धतीने पिकविलेले आंबे त्यांच्या शेतामध्ये आहे. आंब्याला डिसेंबर आणि जानेवारीमध्ये मोहोर येतो. आंब्याला दोन प्रकारच्या किडीचा प्रादुर्भाव होत असतो. परंतु योग्य पद्धतीने त्यांचे व्यवस्थापन व नियोजन केले तर यावर नियंत्रण मिळविणे सहज शक्य असल्याचे लांजे यांनी सांगितले. यामध्ये प्रामुख्याने तुडतुडा (मॅगो हापर) आणि फळमाशी (फुट फ्लाय) या किडीचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी कीटकनाशकांचा वापर करून त्यांचा नायनाट करण्यात येतो.

फळमाशी ही आंबे उत्पादनासाठी खूप घातक आहे. यासाठी फोरोमॉळ टॅपरसा आणि गंध सापळे यांचे हेक्टरी ३० युनिट याप्रमाणे वापर केला जातो. बुरशीचा नायनाट करण्यासाठी ताक व तांबे यांचे सम प्रमाणात मिश्रण घेऊन त्यावर डेअर स्प्रे केल्या जातो. यासोबतच बुरशी नाशकाचाही वापर केला जातो.

टॅग्स :agricultureशेती