शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

खारपाण क्षेत्रात मूत्रपिंड निकामी होण्याचे प्रमाण जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 21:43 IST

अनियंत्रित रक्तदाब व मधुमेहामुळे मूत्रपिंड निकामी होण्याचा सर्वाधिक धोका असतो. परंतु हे दोन आजार नसतानाही दक्षिण-पश्चिम विदर्भातील खारपाण पट्ट्यात मूत्रपिंड निकामी होण्याचे रुग्ण वाढले आहेत. शासनाने याला गंभीरतेने घेऊन तातडीने उपाययोजना करायला हव्यात, असे मत नेफ्रोलॉजी सोसोयटीचे अध्यक्ष डॉ. समीर चौबे व संयोजक डॉ. धनंजय उखळकर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देसमीर चौबे व धनंजय उखळकर यांची माहितीरक्तदाब, मधुमेहाचा मूत्रपिंडाला धोका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनियंत्रित रक्तदाब व मधुमेहामुळे मूत्रपिंड निकामी होण्याचा सर्वाधिक धोका असतो. परंतु हे दोन आजार नसतानाही दक्षिण-पश्चिम विदर्भातील खारपाण पट्ट्यात मूत्रपिंड निकामी होण्याचे रुग्ण वाढले आहेत. शासनाने याला गंभीरतेने घेऊन तातडीने उपाययोजना करायला हव्यात, असे मत नेफ्रोलॉजी सोसोयटीचे अध्यक्ष डॉ. समीर चौबे व संयोजक डॉ. धनंजय उखळकर यांनी व्यक्त केले.जागतिक मूत्रपिंड दिनाच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी डॉ. व्ही.एल, गुप्ता व सोसायटीचे सचिव डॉ. मनीष बलवानी उपस्थित होते.डॉ. उखळकर म्हणाले, पनामा देशातील उस कामगारांमध्ये, श्रीलंकेमधील काही भागात, या शिवाय अमरावती, पुसद, दिग्रस, घाटंजी, नांदेड, बुलडाण्यातही मधुमेह व रक्तदाब नसताना मूत्रपिंड निकामी होण्याचे रुग्ण आढळून येतात. विशेषत: बंजारा समाजात याचे प्रमाण मोठे आहे. विहीर किंवा बोअरवेलच्या पाण्याचा पिण्यासाठी होत असलेला वापर हेही एक यामागील कारण असावे. यातील बहुसंख्य रुग्ण शेवटच्या टप्प्यात येतात. अनेकांना डायलिसीससारखे खर्चिक उपचार झेपत नसल्याने मृत्यूचा आकडाही वाढत आहे. खंडाळामध्ये दर तिसऱ्या घरात रुग्णआकोट तालुक्यातील खंडाळा गावात दर तिसऱ्या घरात मूत्रपिंडाचा रुग्ण आढळून येत आहे. उन्हाळ्यात या विकाराच्या रुग्णांत वाढ होते. हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या मूत्रपिंड विकाराच्या १०० रुग्णांमध्ये २५ रुग्ण हे मूत्रपिंड निकामी होण्याच्या टप्प्यात आलेले असतात.कीटकनाशकाचा अतिवापरडॉ. चौबे म्हणाले, कीटकनाशकाचा अतिवापरामुळे प्रदूषित झालेली पिके, जमीन, हवा व पाण्यामुळेही मूत्रपिंडाचे विकार वाढल्याचे दिसून येते. दुसरे म्हणजे, विहिरी व बोअरवेलचे पाणी खूप खोल गेले आहे. ढोबळमानाने या पाण्याची तपासणी होते. यामुळे विषारी क्षाराची नोंदणीच होत नाही. विकाराला हेही एक कारण आहे.२०४०पर्यंत मूत्रपिंडाचे विकार पाचव्या क्रमांकावरमूत्रपिंड विकारामुळे येणाऱ्या मृत्यूचे प्रमाण २०१६ मध्ये अकराव्या स्थानी होते. शासनाने याला गंभीरतेने न घेतल्यास २०४०पर्यंत हे प्रमाण पाचव्या क्रमांकावर जाऊ शकते. जागतिक किडनी कौन्सिलने संयुक्त राष्ट्रसंघात (यूनो) ही बाब मांडली आहे.

टॅग्स :doctorडॉक्टरHealthआरोग्य