नागपूर : सार्वजनिक बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त अधीक्षक अभियंत्याला एटीएमच्या माध्यमातून १ लाख ३० हजार रुपयाचा चुना लावण्यात आला आहे. ही घटना जरीपटका परिसरात बुधवारी घडली. मेकोसाबाग येथील ६० वर्षीय अधीक्षक अभियंता जीवन निकोसे हे बुधवारी सकाळी कडबी चौक येथील एसबीआयच्या एटीएममध्ये गेले. एटीएम कार्ड मशीनमध्ये टाकण्यात अडचण येत असल्याने त्यांच्या मदतीसाठी एक तरुण पुढे आला. निकोसे यांनी त्याच्यासमोरच एटीएमचा पिन नंबर टाकला. १५ हजार रुपये काढल्यानंतर त्या तरुणाने स्वत: एटीएममधून कार्ड काढले आणि निकोसे यांना सुनील कुमार नावाचे दुसरेच एटीएम कार्ड दिले. आपलेच एटीएम कार्ड समजून निकोसे यांनी ते कार्ड घेऊन ते निघून गेले. काही वेळानंतर त्यांच्या एटीएममधून पैसे ट्रान्सफर झाल्याचे समजले. बँकेशी संपर्क साधेपर्यंत त्यांच्या खात्यातून १ लाख ३० हजार रुपये काढण्यात आले होते. निकोसे यांनी जरीपटका पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.(प्रतिनिधी)
एटीएमद्वारे १.३० लाख रुपयांचा चुना
By admin | Updated: November 6, 2015 04:05 IST