शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

५.५ लाख पंप धारकांकडे ११०० कोटींची थकबाकी

By admin | Updated: August 6, 2014 01:11 IST

महावितरणची कृषी संजीवनी योजना कार्यान्वित झाल्याने पूर्व आणि पश्चिम विदर्भातील सुमारे ५ लाख ५० हजार शेतकऱ्यांना ‘संजीवनी’ मिळणार आहे. यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांच्या वीज देयकाचे

व्याज होणार माफ : कृषी संजीवनी योजनेत ६०० कोटींची ‘संजीवनी’सुरेश सवळे -चांदूरबाजारमहावितरणची कृषी संजीवनी योजना कार्यान्वित झाल्याने पूर्व आणि पश्चिम विदर्भातील सुमारे ५ लाख ५० हजार शेतकऱ्यांना ‘संजीवनी’ मिळणार आहे. यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांच्या वीज देयकाचे सुमारे ६०० कोटींचे व्याज माफ होणार असल्याचे लाभार्थीच्या संख्येवरून स्पष्ट होत आहे. शासनाने ही योजना पुनर्जीवित केली आहे. या योजनेचा लाभ महावितरण कंपनीच्या अकोला विभागांतर्गत अमरावती परिमंडळातील लाखो शेतकऱ्यांना मिळणार आहे. तसेच पूर्व-पश्चिम विदर्भातील सुमारे ६०० कोटींचे व्याज माफ होणार आहे. राज्यात सर्वदूर ही योजना राबविण्यात आली. तथापि, योजनेचा लाभ कृषी पंपधारकांनी घेतला नाही. या योजनेत वीज देयकावर असणाऱ्या कृषी पंपधारकाचे व्याज माफ होणार होते. आता पुन्हा शेतकऱ्यांना संजीवनी देणारा निर्णय शासनाने घेतला. यावेळी मूळ वीज देयक अर्धेच असून अर्धी रकम व्याजदराची आहे. या योजनेत कृषी पंपधारकांना ६०० कोटींची संजीवनी मिळणार आहे. या योजनेत ३१ मार्च २०१४ रोजीच्या थकबाकीतील मूळ रकमेपैकी ५० टक्के रक्कम भरल्यास उरलेली ५० टक्के मूळ रक्कम व पूर्ण थकबाकीच्या रकमेवरील १०० टक्के व्याज व दंड माफ होणार आहे. ३१ मार्च रोजी ज्या शेतकऱ्यांकडे कृषीपंपाची कुठलीही थकबाकी नाही त्यांना पुढील दोन त्रैमासिक अर्थात सहा महिन्यांच्या वीज देयकात ५० टक्के सूट देण्यात येणार आहे. तीन हप्त्यात शेतकरी थकबाकीची रक्कम भरू शकणार आहेत. त्यापैकी पहिला हप्ता किमान २० टक्के ३१ आॅगस्ट २०१४ पर्यंत, दुसरा हप्ता कमीत कमी २० टक्के ३० सप्टेंबरपर्यंत आणि उरलेली रक्कम ३१ आॅक्टोबरपर्यंत भरावयाची आहे. ५० टक्के थकबाकीची रक्कम एकरकमीसुुद्धा भरता येऊ शकते.सध्या जे रोहीत्र नादुरूस्त असतील ते ८० टक्के रक्कम भरल्यानंतर बदलले जातात, मात्र आता ८० टक्क्यांची अट शिथील करण्यात आली आहे. तसेच नियमानुसार फक्त देयक न भरलेल्या शेतकऱ्यांचाच वैयक्तिक वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. या योजनेत थकबाकीदार कृषी पंपधारकासोबत नियमित देयके अदा करणाऱ्या शेतकऱ्यांना संजीवनी मिळणार आहे.