शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
4
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
5
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
6
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
7
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
8
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
9
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
10
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
11
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
12
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
13
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
14
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
15
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
16
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
17
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
18
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
19
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
20
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अंबाझरी चकाचक!

By admin | Updated: May 3, 2015 02:11 IST

नागनदी स्वच्छता अभियानाच्या धर्तीवर महापालिकेने अंबाझरी तलाव व परिसरात स्वच्छता अभियान हाती घेतले आहे.

नागपूर : नागनदी स्वच्छता अभियानाच्या धर्तीवर महापालिकेने अंबाझरी तलाव व परिसरात स्वच्छता अभियान हाती घेतले आहे. पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शनिवारी श्रमदानातून तब्बल ३६ टन कचरा गोळा क रून हा परिसर स्वच्छ केला.अंबाझरी परिसरातील नागरिक सकाळी व सायंकाळी फिरायला येतात. तसेच शहरातील नागरिक व लहान मुलांची येथे गर्दी असते. परंतु मागील काही वर्षात उद्यानाला अवकळा आली आहे. तलावातही मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता. भारत सरकारच्या स्वच्छता अभियानांतर्गत मनपाच्या सर्व झोनमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उद्यानात स्वच्छता अभियान राबविले. महापौर प्रवीण दटके, स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे, आयुक्त श्रावण हर्डीकर, झोनच्या सभापती सारिका नांदूरकर, वर्षा ठाकरे आदींनी सकाळी ७ ते १० दरम्यान श्रमदानात सहभाग घेतला. तलावाच्या काठावरील जॉगिंग ट्रॅक स्वच्छ केला. मनपातर्फे दर शुक्रवारी सकाळी ८ ते १० या कालावधीत झोननिहाय स्वच्छता अभियान राबविले जाते. दटके व हर्डीकर यांच्या संकल्पनेतून सर्व झोनमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊ न अंबाझरी उद्यान परिसराची स्वच्छता केली. २८ एप्रिलला अंबाझरी तलाव व परिसराची पाहणी करून श्रमदानाचा निर्णय घेण्यात आला होता. एक किलोमीटर लांबीचा तलावाचा बांध दहा झोनमध्ये विभाजित करून प्रत्येक झोनला १०० मीटरचा बांध (जॉगींग ट्रॅक)व त्या लगतचा परिसर स्वच्छ करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यानुसार प्रत्येक झोनमधील सहायक आयुक्त, अधिकारी व कर्मचारी यांच्यासह मुख्यालयातील विभाग प्रमुख यांना सहकार्यासाठी नेमण्यात आले होते. उपायुक्त संजय काकडे, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, आरोग्य उपसंचालक डॉ. मिलिंद गणवीर, अधीक्षक अभियंता शशिकांत हस्तक, नगरयंत्री संजय गायकवाड, विकास अभियंता राहुल वारके, कार्यकारी अभियंता संजय जयस्वाल, वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक दासरवार, कार्यकारी अभियंता सतीश नेरळ, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, कार्यकारी अभियंता मनोज तालेवार, श्याम चव्हाण, रंजना लाडे, स्थावर अधिकारी डी.डी. जांभुळकर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, वाहतूक अभियंता एस.एल. सोनकुसरे, एलबीटी विभागाचे सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम, यांच्यासह झोनचे सहायक आयुक्त गणेश राठोड, राजेश कऱ्हाडे, विजय हुमणे, डी.डी.पाटील, महेश मोरोणे, अशोक पाटील, हरीश राऊ त, प्रकाश वऱ्हाडे, राजू भिवगडे यांच्यासह झोनचे उपअभियंता, आरोग्य झोनल अधिकारी, ग्रीन व्हीजल फाऊं डेशनचे दक्षा बोरकर, सुरभी जैस्वाल, सर्पमित्र गौरांक वाईकर, अतुल तरारे यांच्यासह नागरिकांचा सहभाग होता. (प्रतिनिधी)महापौर, आयुक्तांचा प्रत्यक्ष सहभागपदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी प्रवीण दटके व श्रावण हर्डीकर यांनी स्वच्छता अभियानात प्रत्यक्ष सहभाग घेतला. त्यामुळे कर्मचारी व अधिकारी जोमाने कामाला लागले. अंबाझरी बांधाचा उतार जास्त असल्याने दोरखंंडाच्या सहाय्याने हात धरून कचरा गोळा करण्यात आला. स्वच्छता अभियानात सहभागी झालेल्यांना कोणत्याही स्वरुपाची इजा होऊ नये यासाठी अग्निशमन विभागातर्फे दोन बोटी ठेवण्यात आल्या होत्या. तसेच वैद्यकीय सेवेसाठी मोबाईल रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली होती.३६ टन कचरा गोळा केलास्वच्छता अभियानादरम्यान तलाव व उद्यान परिसरात पडलेल्या प्लास्टीक बॉटल, पालापाचोळा गोळा करण्यात आला. काटेरी झुडपे, गवत काढून गोळा करण्यात आले. श्रमदानातून तब्बल ३६ टन कचरा गोळा करण्यात आला. नागनदी प्रमाणे अंबाझरी तलावाचा परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. यात नागरिकांचाही सहभाग होता.