स्कॉट स्ट्राऊड यांचे प्रतिपादन : आंबेडकर विचारधारा विभागातर्फे व्याख्यान नागपूर : प्र्रॅगमॅटिझम (व्यवहारवाद) ही संकल्पना विकसित करण्यामध्ये डॉ. जॉन ड्युई यांचे विशेष योगदान आहे. डॉ. आंबेडकर हे कोलंबिया विद्यापीठात शिकत असताना डॉ. जॉन ड्युई हे त्यांचे प्राध्यापक होते. त्यामुळे व्यवहारवादाचा फार मोठा प्रभाव डॉ. आंबेडकरांवर पडला. डॉ. आंबेडकरांनी आधुनिक काळात भारतामध्ये प्रॅगमॅटिझम आणला, असे विचार अमेरिकेतील टेक्सॉस विद्यापीठातील कम्युनिकेशन विभागातील प्राध्यापक डॉ. स्कॉट स्ट्राऊड यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभागात ‘व्यवहारवादाचा भारतात प्रवास-डॉ. आंबेडकर, जॉन ड्युई आणि सामाजिक न्यायाचा प्रयत्न’ या विषयावर व्याख्यान देताना डॉ. स्कॉट स्ट्राऊड बोलत होते. डॉ. आंबेडकर विचारधारा विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आगलावे होते. डॉ. स्ट्राऊड यांनी डॉ. आंबेडकरांवर अनेक संशोधन पेपर लिहिले आहेत. इतकेच नव्हे तर ते प्रॅगमॅटिझम आणि डॉ. आंबेडकर या विषयावर मोठा ग्रंथ लिहित आहेत. पुढे डॉ. स्ट्राऊड म्हणाले की, प्रॅगमॅटिझमचा प्रभाव डॉ. आंबेडकरांच्या विचार आणि कार्यावरही पडला. डॉ. आंबेडकरांनी मार्क्सवाद नाकारला आणि बुद्ध धम्म स्वीकारला. बुद्धधम्मामध्ये ‘प्रॅगमॅटिझम’ आहे. हासुद्धा डॉ. आंबेडकरांवर पडलेला डॉ. जॉन ड्युई आणि प्रॅगमॅटिझमचा प्रभाव होय. डॉ. प्रदीप आगलावे यांनी प्रास्ताविक केले. संचालन डॉ. रमेश शंभरकर यांनी केले. प्रा. शैलेंद्र धोंंगडे यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)
आंबेडकरांमुळेच ‘प्रॅ्रगमॅटिझम’ आला
By admin | Updated: January 12, 2017 02:07 IST