शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कुमुद पावडे यांना आंबेडकर जीवन गौरव

By admin | Updated: April 30, 2017 01:42 IST

येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका प्रा. डॉ. कुमुदताई पावडे यांना आंबेडकरराईट मुव्हमेंट आॅफ कल्चर अ‍ॅण्ड लिट्रेचरतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.

ई.झेड. खोब्रागडे यांच्या ‘आणखी एक पाऊल’ या पुस्तकालाही पुरस्कार नागपूर : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका प्रा. डॉ. कुमुदताई पावडे यांना आंबेडकरराईट मुव्हमेंट आॅफ कल्चर अ‍ॅण्ड लिट्रेचरतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच माजी सनदी अधिकारी ई.झेड. खोब्रागडे यांच्या ‘आणखी एक पाऊल’ या पुस्तकाला दया पवार आत्मकथन पुरस्कार सुद्धा जाहीर झाला आहे. ज्येष्ठ नाटककार आणि संस्थेचे अध्यक्ष दादाकांत धनविजय यांनी शनिवारी पत्रपरिषदेत २०१६ च्या पुरस्कारांची घोषणा केली. प्रा. डॉ. कुमुदताई पावडे यांचे स्त्रियांच्या हक्कासाठी स्त्रीमुक्ती चळवळीत मोलाचे योगदान आहे. ‘अंत:स्फोट’ हे त्यांचे गाजलेले आत्मकथन आहे. विपुल वैचारिक लेखन त्यांनी केले आहे. त्यांनी सामाजिक आणि साहित्यिक चळवळीत आयुष्य वेचले आहे. त्यामुळे त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यासोबतच मुंबईतील बी. रंगाराव यांच्या ‘उत्तर आधुनिकता: समकालीन साहित्य, समाज व संस्कृती या पुस्तकाला वसंत मून वैचारिक संशोधन पुरस्कार, इ.झेड. खोब्रागडे यांच्या ‘आणखी एक पाऊल’ या पुस्तकाला दया पवार आत्मकथन पुरस्कार, नांदेड येथील प्रा. रविचंद्र हडसनकर यांच्या ‘काळीजकुपी’ या कवितासंग्रहाला नामदेव ढसाळ काव्य पुरस्कार, अमावतीचे सुदाम सोनुले यांच्या ‘डंख’ या कथासंग्रहासाठी बाबुराव बागूल कथा पुरस्कार, डॉ. ईश्वर नंदपुरे यांच्या ‘चेहरे आणि मुखवटे’ या नाट्यकृतीला अश्वघोष नाट्यपुरस्कार आणि दिल्लीे डॉ. पूरण सिंह यांच्या ‘वचन और सौ हिंदी लघु कहानिया या पुस्तकाला भगवानदास हिंदी साहित्य पुरस्कार सुद्धा यावेळी जाहीर करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कारासाठी रोख १० हजार रुपये, सन्मानपत्र, शाल, व स्मृतिचिन्ह तर राज्यस्तरीय वाड्मय पुरस्कारासाठी ५ हजार रुपये रोख, शाल व स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या ६ मे रोजी हिंदी मोरभवन सीताबर्डी येथे सायंकाळी ५.३० वाजता आयोजित समारंभात हे पुरस्कार वितरित केले जातील. शुद्र या गाजलेल्या कादंबरीचे लेखक सुधाकर गायकवाड यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होईल. यावेळी बार्टीचे महासंचालक राजेश ढाबरे प्रमुख अतिथी राहतील. पत्रपरिषदेत भूपेश थूलकर, डॉ. मच्छिंद्र चोरमारे, महेंद्र गायकवाड, राजन वाघमारे, डॉ. सविता कांबळे, डॉ. सुदेश भोवते, पल्लवी जीवनतरे आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)