शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

‘आनंद सागर’च्या धर्तीवर अंबाझरीचा विकास

By admin | Updated: July 2, 2014 01:01 IST

स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर यांनी महापालिकेच्या अर्थसंकल्पात पर्यटनावर विशेष भर दिला आहे. त्यांनी अर्थसंकल्पात ‘पर्यटन शहर, नागपूर शहर’चा नारा दिला असून, अंबाझरी उद्यानाचा

अर्थसंकल्प : ‘पर्यटन शहर, नागपूर शहर’चा नारानागपूर : स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर यांनी महापालिकेच्या अर्थसंकल्पात पर्यटनावर विशेष भर दिला आहे. त्यांनी अर्थसंकल्पात ‘पर्यटन शहर, नागपूर शहर’चा नारा दिला असून, अंबाझरी उद्यानाचा ‘आनंद सागर’च्या धर्तीवर विकास करण्याची योजना सादर केली आहे. या प्रकल्पासाठी ६४ कोटी रुपये खर्च येईल. बीओटी तत्त्वावर हा प्रकल्प साकारण्यात येणार असल्यामुळे महापालिकेवर याचा एक रुपयाचाही बोझा पडणार नाही. प्रकल्पाचा अहवाल तयार करण्यात आला आहे. यात अ‍ॅम्युजमेंट पार्क, क्लब हाऊस, स्कल्पचर गार्डन, वॉटर राइडर्स, लेजर शो, मिनी इंडिया, रेस्टिंग हट्स, लॉन, फूड झोन, पार्किंग आदी सुविधा राहतील. प्रकल्पावर कायदेशीर सल्ला घेऊन लवकरच निविदा प्रक्रिया सुरू केली जाईल. महापालिकेची आर्थिक स्थिती खराब आहे. यासाठी बीओटी तत्त्वावर आधारित प्रकल्पांवरच अर्थसंकल्पात अधिक भर देण्यात आला आहे. बीओटी तत्त्वावर आधारित बहुतांश प्रकल्प पूर्व नागपुरात साकारले जात आहेत. वाठोडा येथे क्रीडा संकुल, व्यावसायिक संकुल, क्लब हाऊस, लॉनतयार केले जाईल. क्वेटा कॉलनी येथे देवडिया भवनच्या जागेवर बीओटी तत्त्वावर अत्याधुनिक हॉस्पिटल तयार केले जाईल. महालस्थित बुधवार बाजार बीओटी तत्त्वावर विकसित केला जाईल. सक्करदरा चौकातील बुधवार बाजार व शॉपिंग मॉल बांधण्याचादेखील प्रस्ताव आहे. दूषित पाणी शुद्धीकरणावर भर शहरातून दररोज निघणाऱ्या सांडपाण्यापैकी ३४५ ते ४०० एमएलडी दूषित पाणी शुद्ध करण्यासाठी काही योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. भांडेवाडी मलनिस्सारण केंद्राची क्षमता २०० एमएलडी करायची आहे. जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत ४९,११४ कोटी रुपये खर्चून उत्तर सिवरेज झोनअंतर्गत सिवर लाईन टाकली जाईल. पाच एमएलडीचे दोन लहान एसटीपी मोक्षधाम व मानकापूर येथे उभारले जात आहेत. अवैध नळ कनेक्शन वैध होणार अर्थसंकल्पात पाणीपट्टीपासून तब्बल १५० कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित धरले आहे. याबाबत सत्तापक्ष नेते प्रवीण दटके यांनी सांगितले की, जलकरापासून उत्पन्नवाढीसाठी उपाय योजले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून अवैध नळ कनेक्शन वैध करून त्यांच्याकडून जलकर वसूल केला जाईल. असा आहे अर्थसंकल्प ५७२ व १९०० ले-आऊटपैकी महापालिकेला हस्तांतरित २३३ ले-आऊटच्या विकासासाठी ४० कोटी रुपयांची तरतूद.महापालिकेच्या हद्दीत समावेश करण्यात आलेल्या नरसाळा व हुडकेश्वर येथील ९७२.८० हेक्टर क्षेत्राच्या विकासासाठी पाच कोटींची तरतूद.हजारी पहाड गावाच्या विकासासाठी २५ लाख, पुनापूर व पारडी गावाच्या विकासासाठी एक कोटी रुपये. भांडेवाडी येथे पाच कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून हॉट मिक्स प्लांट उभारला जाईल. पारडी येथे श्री संत तुकाराम महाराज यांचा पुतळा उभारण्यासाठी ६० लाख रुपये. मस्कासाथ येथे ५० लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून मटन शॉप. पारडी येथे प.पू. परमात्मा एक सेवक समाज भवनाचे बांधकाम तसेच दक्षिण नागपुरात संत तुकाराम महाराज यांच्या नावाने समाजभवनाचे बांधकाम करण्यासाठी ५० लाख रुपये. जुनी शुक्रवारी रोडवर बंद पडलेल्या महापालिकेच्या चिटणीसपुरा प्राथमिक शाळेच्या इमारतीत १ कोटी रुपये खर्चून बाळासाहेब ठाकरे स्मृती शैक्षणिक कला, क्रीडा व सांस्कृतिक केंद्र उभारले जाईल. सुलभ शौचालय तसेच ई-शौचालयासाठी तीन कोटी रुपयांची तरतूद. दहनघाटांवर नि:शुल्क अंत्यसंस्कारासाठी नि:शुल्क गोवऱ्या उपलब्ध करून देण्यावर विचार.