शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रोच्या गॅलरीतून दिसेल अंबाझरी तलाव

By admin | Updated: June 19, 2017 02:19 IST

नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत पूर्व-पश्चिम कॉरिडोअर अंतर्गत अंबाझरी मेट्रो रेल्वे स्टेशनमध्ये एक किमी लांब प्रेक्षक गॅलरी तयार करण्यात येणार आहे.

धरमपेठ कॉलेज मेट्रो स्टेशन अ‍ॅक्वा थीमवरआनंद शर्मा । लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत पूर्व-पश्चिम कॉरिडोअर अंतर्गत अंबाझरी मेट्रो रेल्वे स्टेशनमध्ये एक किमी लांब प्रेक्षक गॅलरी तयार करण्यात येणार आहे. या गॅलरीमधून रेल्वे प्रवासी आणि पर्यटक अंबाझरी तलावाचे विहंगम दृष्य पाहू शकतील. धरमपेठ कॉलेज मेट्रो स्टेशन या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या स्टेशनचे मुख्य आकर्षण म्हणजे ही गॅलरीच राहील. यासोबतच या मेट्रो स्टेशनचे बांधकाम अ‍ॅक्वा थीमवर आधारित करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे प्रबंध निदेशक बृजेश दीक्षित यांनी लोकमतशी बोलताना दिली. बृजेश दीक्षित यांनी सांगितले की, धरमपेठ कॉलेज मेट्रो स्टेशनचे बांधकाम सुरू झाले आहे. येथील रस्त्याच्या एका बाजूला काम सुरू झाले आहे. संपूर्ण रेल्वे स्टेशनचे काम दोन वर्षात पूर्ण करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. या स्टेशनचे विशेष आकर्षण म्हणजे धरमपेठ कॉलेज मेट्रो स्टेशन ते सुभाषनगर मेट्रो स्टेशनपर्यंत तब्बल एक किमी लांब गॅलरी खास पर्यटन व प्रवाशांसाठी तयार करण्यात येणार आहे. या गॅलरीच्यावर मेट्रो रेल्वेचे प्लेटफॉर्म बनविले जातील. या गॅलरीमध्ये जाण्यासाठी सुद्धा तिकीट काढावी लागेल. या गॅलरीमधून स्थानिक प्रवासी, नागरिक आणि खास पर्यटनासाठी आलेले लोक अंबाझरी तलावातील विहंगम दृष्याचा नजारा पाहू शकतील. येथील विवेकानंद स्मारकाचे दर्शन घेऊ शकतील. अंबाझरी मेट्रो स्टेशनवर फूड प्लाजा, मनोरंजनाचे साधन, वाय-फाय कनेक्टिव्हीटीसह इतर आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. अंबाझरी तलाव लागून असल्याने या मेट्रो स्टेशनला ‘अ‍ॅक्वा थीमवर बनवण्यात येणार आहे. याअंतर्गत स्टेशनचे छत, बाहेरच्या भिंतींसाठी जल रंगाचा वापर करण्यात येईल. या स्टेशनच्या डिझाईनचे काम अजूनही सुरू आहे. स्टेशन बांधकामाचे कंत्राट आयटीडी सीमेंटेशन कंपनीला देण्यात आले आहे. क्रेझी कॅसलला लागून असलेली जमीन मागितली दीक्षित यांनी सांगितले की, धरमपेठ कॉलेज मेट्रो स्टेशनचे बांधकाम सुरू झाले असले तरी ते रस्त्याच्या एकाच बाजूने सुरू आहे. दुसऱ्या बाजूच्या क्रेझी कॅसलला लागून असलेली शासकीय जमीन स्टेशनच्या बांधकामासाठी आवश्यक आहे. यासाठी महामेट्रोतर्फे नागपूर सुधार प्रन्यासला ही जागा मागण्यात आली आहे. ही जमीन मिळाल्यावर येथील स्टेशनचे काम आणखी गतीने करता येईल.