शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

चायना पिकवितोय नागपुरातील आंबे

By admin | Updated: April 24, 2017 01:28 IST

फळे पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडसह आता चीनच्या ‘इथेलिन रायपनर’ (अनसॉल्टेड पावडर) या आरोग्याला घातक आणि अतिविषारी रसायनाचा उपयोग मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे.

अतिविषारी ‘इथेलिन रायपनर’ रसायनाचा उपयोग : सहा तासातच आंबे पिकतातमोरेश्वर मानापुरे नागपूरफळे पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडसह आता चीनच्या ‘इथेलिन रायपनर’ (अनसॉल्टेड पावडर) या आरोग्याला घातक आणि अतिविषारी रसायनाचा उपयोग मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. पांढऱ्या टी-बॅगमधील (पाऊच) या रसायनाने कच्ची फळे केवळ सहा तासातच पिकतात आणि विक्रीसाठी तयार होतात. याकडे अन्न व औषध प्रशासन विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. अधिकाऱ्यांच्या संगनमताने व्यापारी लोकांच्या जीवाशी खेळत असल्याचा प्रकार कळमना फळे बाजारात सर्रास सुरू आहे. रसायनाचा कोट्यवधींचा व्यवसायचीनच्या ‘इथेलिन रायपनर’ रसायनाचा व्यवसाय ९८ टक्के बाजारपेठांमध्ये सुरू आहे. कोट्यवधी रुपयांच्या रसायनाची भारतात बिनदिक्कत विक्री सुरू आहे. याकडे केंद्र आणि राज्य सरकारचे दुर्लक्ष आहे. या व्यवसायात अन्न आणि औषध विभाग आणि वैधमापनशास्त्र विभागाचे अधिकारी लिप्त असल्याची माहिती सूत्रांनी दिली. हजारो टन रसायनयुक्त आंब्याची विक्री कळमन्यात हजारो क्विंटल आंब्याची आवक होत आहे. आंध्र प्रदेशासह रत्नागिरी येथून आंब्याची खेप दररोज बाजारात येत आहे. किरकोळ बाजारात आंध्र प्रदेशातील बैंगनफल्ली आंब्याची सर्वाधिक विक्री होते. दररोज हजारो क्विंटल पिकविलेल्या आंब्याच्या विक्रीतून व्यापारी मालामाल होत आहे. त्या बदल्यात व्यापारी ग्राहकांना आंबारूपी विष देत आहे. व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आता सर्वस्तरातून होत आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई शून्ययंदाच्या उन्हाळ्यात दररोज लाखो रुपयांच्या आंब्याची उलाढाल सुरू आहे. आंबे कृत्रिमरीत्या पिकविण्यात येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांना आहे. पण आर्थिक व्यवहारामुळे अधिकाऱ्यांनी एकाही आंबे विक्रेत्यांवर कारवाई केलेली नाही. तीन दिवसांपूर्वी चीनच्या इथेलिन रायपनर पावडरने पिकविलेले ८३९ क्विंटल आंबे अधिकाऱ्यांनी जप्त करून नष्ट केल्याचे वृत्त आहे. आंबा विषारी झाला आहे. कारवाईसाठी अधिकारी कुणाची वाट पाहात आहे, असा गंभीर प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. सदर प्रतिनिधीने कळमना फळ बाजाराची पाहणी केली असता सर्वच दुकानांमध्ये हजारो कच्च्या आंब्याच्या पेटीत या विषारी रसायनाच्या पांढऱ्या टी-बॅग दिसून आल्या या पाऊचवर शेनडाँग अवोएट बायोटेक्नॉलॉजी कं.लि., शेनकाँग, चायना असे लिहिले आहे. या शिवाय ‘फ्रेश फ्रूट रिपेनिंग’सह मुलांना यापासून दूर ठेवण्याची नोंद आहे. हे पाऊच व्यापाऱ्यांना सहजरीत्या उपलब्ध होत आहे. आंबे पिकविण्यासाठी या पावडरचे पाऊच पाण्यात भिजवून कच्च्या फळांच्या पेटीत ठेवण्यात येते. या पाऊचमधून निघणाऱ्या इथेलिन गॅसमुळे आंबे पाच ते सहा तासातच पिकतात आणि पिवळे गडद होतात. पिवळ्या रंगाच्या आंब्याला जास्त भाव आणि बाजारात मागणी असल्यामुळे व्यापारीसुद्धा या पावडरचा उपयोग मोठ्या प्रमाणात करीत आहेत. अन्न व औषध विभागाचे अधिकारी या भ्रष्टाचाराकडे चक्क कानाडोळा करीत असल्यामुळे कृत्रितरीत्या आंबे पिकविण्याचा उद्योग दिवसेंदिवस वाढतच आहे. अशा विषारी प्रक्रियेवर प्रतिबंध आणण्याची मागणी ग्राहक संघटनांनी लोकमतशी बोलताना केली. ‘इथेलिन रायपनर’ आरोग्याला घातककॅल्शियम काबाईड आणि इथेलिन रायपनर पावडरचा उपयोग करून कृत्रिमरीत्या पिकविलेले विषारी आंबे आरोग्याला घातक असल्याचे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले. या आंब्याच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. गडद पिवळ्या रंगाच्या आंब्याचे सेवन लहानांपासून वयस्कांपर्यंत करू नये, असा सल्ला त्यांनी दिला. अन्नधान्याप्रमाणे फळांमध्येही भेसळ करण्याची प्रवृत्ती वाढलेली आहे. कॅल्शियम कार्बाइडवर राज्य सरकारने बंदी घातली आहे. विषारी आंब्यावर विभाग कारवाई केव्हा करणार, हा गंभीर प्रश्न आहे. याशिवाय ‘एमआयगु्रप आॅन-३९’ या ‘प्लान्ट ग्रोथ रेग्युलेटर’ असे नमूद असलेल्या आणि झाडांना देण्यात येणाऱ्या रसायनाचा (लिक्विड) उपयोग द्राक्षे, केळी, पपई या सारखी फळे पिकविण्यासाठी करण्यात येतो. यामुळे फळांना रंग येतो आणि लवकर पिकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली. धडक मोहीम राबविणाररसायनाने आंबे पिकविणाऱ्या व्यापाऱ्यांवर तातडीने कडक कारवाई करणार आहे. राज्य शासनाने प्रतिबंधित केलेल्या आणि आरोग्याला घातक असलेल्या रसायनाचा उपयोग करू नका, असे व्यापाऱ्यांना वारंवार सांगितले आहे. त्यानंतर व्यापारी घातक रसायनाचा उपयोग फळे पिकविण्यासाठी करीत असेल तर धडक मोहीम राबवून त्यांच्यावर कडक कारवाई करू. शशिकांत केकरे, उपायुक्त (अन्न),अन्न व औषध प्रशासन विभाग.