शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

घरावर अधिकार असला तरी बळजबरीने ताबा घेणे अवैध

By admin | Updated: February 28, 2016 03:19 IST

एखाद्याचा वडिलोपार्जित घरावर अधिकार असला तरी, त्या घराचा बळजबरीने ताबा घेणे अवैध आहे असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे.

हायकोर्टाचा निर्वाळा : नुकसान भरपाई देण्याचे निर्देशनागपूर : एखाद्याचा वडिलोपार्जित घरावर अधिकार असला तरी, त्या घराचा बळजबरीने ताबा घेणे अवैध आहे असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. तसेच, घराचा बळजबरीने ताबा घेणाऱ्या दाम्पत्याने याचिकाकर्त्यास ५०० रुपये प्रति दिवसप्रमाणे नुकसान भरपाई द्यावी असे निर्देश दिले आहेत.महेश घोटेकर असे याचिकाकर्त्याचे नाव आहे. उर्विला कॉलनी येथे त्यांचे सहा खोल्यांचे वडिलोपार्जित घर आहे. आई-वडिलाचा मृत्यू झाल्यानंतर तीन खोल्यांमध्ये त्यांचे मोठे भाऊ व वहिनी राहात होत्या. २००७ मध्ये भावाचा मृत्यू झाला व वहिनी बहिणीकडे रहायला गेल्या. यामुळे या तीन खोल्या २००६ ते २००८ पर्यंत याचिकाकर्त्याच्या ताब्यात होत्या. बेसा येथे घर घेतल्यानंतर त्यांनी या खोल्या एका डॉक्टरला भाड्याने दिल्या. ३१ आॅगस्ट २०११ रोजी डॉक्टरने खोल्या खाली केल्या. यानंतर याचिकाकर्त्याच्या दिवंगत मोठ्या भावाच्या मुलीने १ नोव्हेंबर २०११ पासून या खोल्यांचा ताबा घेतला. परिणामी याचिकाकर्त्याने दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला. हा दावा खारीज करण्यात आला. यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती आर. के. देशपांडे यांनी सिंबंधित दाम्पत्याने घराचा ताबा याचिकाकर्त्यास द्यावा. े घर खाली करण्यापासून ते दिवाणी न्यायालयाच्या आदेशाच्या तारखेपर्यंत ५०० रुपये दिवसाप्रमाणे याचिकाकर्त्यास नुकसान भरपाई द्यावी असे सांगितले. संबंधित दाम्पत्याला पुढील सहा आठवड्यापर्यंत घरात राहू द्यावे. यानंतर याचिकाकर्त्याला घराचा ताबा मिळविता येईल असे स्पष्ट केले. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. एस. ए. काळबांडे यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)