नागपूर : विदर्भात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरत आहे. फेब्रुवारी महिन्यापर्यंत नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ व अकोला जिल्ह्यात वाढत असलेली रुग्णसंख्या आता चंद्रपूर, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातही दिसून येत आहे. नागपूर जिल्ह्यात सलग चवथ्या दिवशी दैनंदिन रुग्णांची संख्या हजारावर गेली. ११८३ नवे रुग्ण व ९ मृत्यूची नोंद झाली. अमरावती जिल्ह्यात ६३१ बाधित व ३ रुग्णांचे जीव गेले. तर दोन दिवसांत बुलडाणा जिल्ह्यात रुग्णसंख्या ८३७ वर गेली आहे. मार्च महिन्यात दुसऱ्यांदा या जिल्ह्यात रुग्णसंख्येने उच्चांक गाठला. याशिवाय, अकोला जिल्ह्यात ३९१ रुग्ण व दोन मृत्यू, यवतमाळ जिल्ह्यात २८० रुग्ण व ४ मृत्यू, वाशिम जिल्ह्यात २४५ रुग्ण व १ मृत्यू तर वर्धा जिल्ह्यात १९४ रुग्ण व तीन रुग्णांचे बळी गेले आहेत. वर्धा जिल्ह्यातही आता रुग्णसंख्या वाढताना दिसून येत आहे. १९४ रुग्ण व ३ मृत्यूची नोंद झाली. विदर्भात आज ३,९६२ रुग्ण व २५ रुग्णांचे जीव गेले. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
जिल्हा रुग्ण ॲ. रुग्ण मृत्यू
नागपूर ११८३ १५६४५८ ०९
भंडारा ४७ १३८९१ ०
गडचिरोली १८ ९६६३ ०
वर्धा १९४ १३३१४ ३
चंद्रपूर १२० २४११६ ०
गोंदिया १६ १४५३० ०
अमरावती ६३१ ३९०७८ ०३
यवतमाळ २८० १८९७३ ४
अकोला ३९१ १८७८० २
बुलडाणा ८३७ २०९२५ ३
वाशिम २४५ ९९७८ १