शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कारपीडित मुलीला गर्भपाताची परवानगी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:07 IST

नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील बलात्कारपीडित अल्पवयीन मुलीचा गर्भपात करण्याची परवानगी मिळविण्यासाठी आईने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल ...

नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील बलात्कारपीडित अल्पवयीन मुलीचा गर्भपात करण्याची परवानगी मिळविण्यासाठी आईने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने मुलीच्या आवश्यक वैद्यकीय तपासण्या करण्यासाठी चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील तज्ज्ञांचे मंडळ स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच मंडळाकडे २८ मेपर्यंत अहवाल मागितला आहे.

या प्रकरणावर न्यायमूर्ती पुष्पा गणेडीवाला यांच्या समक्ष सुनावणी झाली. पीडित मुलगी १५ वर्षे वयाची असून, तिच्या गर्भात २१ आठवड्यांचे बाळ आहे. तिच्यावर बांधकाम मजूर सहीराम संजय गायकवाडने बलात्कार केल्याचा आरोप आहे. गायकवाडविरुद्ध जीवती पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी आरोपीला कामावर ठेवले होते. दरम्यान, त्याने ६ मार्च २०२० रोजी मुलीचे अपहरण करून तिला कोल्हापूर जिल्ह्यातील गावात नेले. तेथे मुलीवर वारंवार बलात्कार केला. मुलीला ८ मे २०२१ रोजी आरोपीच्या ताब्यातून सोडविण्यात आले, तेव्हा ती गर्भवती असल्याचे आढळून आले. मानसिक व आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे कुटुंबीयांनी तिचा गर्भपात करण्याचा निर्णय घेतला आहे. याचिकाकर्तीतर्फे अ‍ॅड. स्विटी भाटिया यांनी कामकाज पाहिले.