शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

आर्यन खानच्या मुलभूत अधिकारांची पायमल्ली होत असल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2021 18:38 IST

Nagpur News शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून अमली पदार्थ सेवन प्रकरणामध्ये आर्यन खानच्या मूलभूत अधिकारांची पायमल्ली झाली, असा गंभीर आरोप केला आहे.

ठळक मुद्देशिवसेना नेते किशोर तिवारी यांची प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी

नागपूर : शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून अमली पदार्थ सेवन प्रकरणामध्ये आर्यन खानच्या मूलभूत अधिकारांची पायमल्ली झाली, असा गंभीर आरोप केला आहे, तसेच या प्रकरणाची सखोल न्यायिक चौकशी करण्याची मागणी केली आहे. (Alleged violation of Aryan Khan's fundamental rights)

अमली पदार्थ नियंत्रण पथकाने मुंबई झोन संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वामध्ये गेल्या २ आॅक्टोबरला अरबी समुद्रातील एका आलिशान जहाजावरील रेव्ह पार्टीत छापा टाकला. दरम्यान, पथकाने विविध प्रकारचे अमली पदार्थ जप्त केले, तसेच बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खानचा मुलगा आर्यन व इतर आरोपींना अटक केली. ही कारवाई प्रामाणिक उद्देशाने करण्यात आली नाही, असे तिवारी यांचे म्हणणे आहे.

मुंबई झोन संचालक समीर वानखेडे यांची पत्नी मराठी अभिनेत्री असून त्यांना बॉलिवूडमध्ये नावलौकिक मिळवायचा आहे. त्यामुळे अमली पदार्थ नियंत्रण विभागाने गेल्या दोन वर्षांपासून बॉलिवूडमधील मोठे अभिनेते, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मॉडेल्स, निमार्ते, दिग्दर्शक आदींना लक्ष्य केले आहे. अभिनेता सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासाआड बेकायदेशीर कारवाया केल्या जात आहेत. त्यामागे वानखेडे व इतर अधिकाऱ्यांचा वाईट हेतू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनीही या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून लवकरच सत्य पुढे आणण्याचा दावा केला आहे. परिणामी, प्रकरणाची सखोल न्यायिक चौकशी होणे गरजेचे आहे, असे तिवारी यांनी याचिकेत नमूद केले आहे.आर्यन सध्या आर्थर रोड कारागृहात आहे. एनडीपीएस कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयाने त्याच्या जामीन अर्जावर निर्णय देण्यासाठी २० आॅक्टोबर ही तारीख निश्चित केली आहे. ही आर्यनची पिळवणूक आहे. कायद्यानुसार, या न्यायालयाने आर्यन व इतर आरोपींच्या जामीन अर्जावर तातडीने निर्णय देणे आवश्यक होते. परंतु, या न्यायालयाने कायद्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आर्यन व इतर आरोपींचे मूलभूत अधिकार बाधित झाले, याकडेही तिवारी यांनी लक्ष वेधले आहे.

टॅग्स :Aryan Khanआर्यन खान