शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरवर विनयभंगाचा आरोप

By admin | Updated: October 20, 2016 03:15 IST

औषधोपचारासाठी आलेल्या एका युवतीसोबत (वय १८) डॉक्टरने अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग केला. याबाबत कुणालाही काही सांगितल्यास जीवे ठार मारेन, अशी धमकी दिली.

लकडगंज आणि यशोधरानगरातही घटना : पोलिसांनी नोंदविले गुन्हेनागपूर : औषधोपचारासाठी आलेल्या एका युवतीसोबत (वय १८) डॉक्टरने अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग केला. याबाबत कुणालाही काही सांगितल्यास जीवे ठार मारेन, अशी धमकी दिली. पीडित युवतीने आपल्या पालकांना आणि नंतर पोलिसांना ही माहिती दिल्यानंतर शांतिनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अशाच प्रकारे लकडगंज आणि यशोधरानगरातही विनयभंगाचे गुन्हे घडले. पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या आरोपी डॉक्टरचे नाव संजू मिठूजी मेश्राम (वय ४८) आहे. तो शांतिनगर क्लिनीकमध्ये राहतो. त्याच्या क्लिनिकवर जीम आहे. तेथे पीडित युवती इन्स्ट्रक्टर असल्याचे समजते. १० आॅक्टोबरच्या दुपारी १ वाजता पीडित युवती बरे नसल्याने डॉक्टरकडे आली. तेथे तपासण्याच्या बहाण्याने मेश्रामने तिच्यासोबत लज्जास्पद वर्तन केल्याचा युवतीचा आरोप आहे. हरकत घेतली असता डॉक्टरने याबाबत कुठे वाच्यता केल्यास जीवे ठार मारेन, अशी धमकी दिल्याचे युवतीने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत नमूद केले. त्यामुळे शांतिनगर पोलिसांनी आरोपी डॉ. मेश्रामविरुध्द विनयभंगाचा गुन्हा नोंदविला. अपहरणाच्या अन्य दोन घटना लकडगंज आणि यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही घडल्या. तहसीलमधील २४ वर्षीय तरुणी आपल्या लकडगंजमधील दुकानासमोर स्कुटी उभी करीत असताना आरोपी आकाश चांडक (वय ३८, रा.धारस्कर मार्ग) याने तिला अश्लील शिवीगाळ करून विनयभंग केला. त्यानंतर तिच्या दुकानासमोरचा सीसीटीव्ही कॅमेरा दंड्याने तोडून नुकसान केले. तसेच जीवानिशी मारण्याची धमकी दिली. सोमवारी दुपारी साडेचार ते पाचच्या सुमारास ही घटना घडली. त्याचप्रमाणे १६ वर्षीय मुलगी शाळेत जात असताना आरोपी शेख सलमान शेख अकिल (वय २०) याने १३ ते १७ आॅक्टोबर दरम्यान तिचा रोज विनयभंग केला. तिने आपल्या गाडीवर बसावे म्हणून आरोपी तिला धमकावून शिवीगाळ करीत होता. या दोन्ही प्रकरणात पीडितांच्या तक्रारीवरून पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.(प्रतिनिधी)