शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

सावनेरच्या ‘बीडीओ’वर भ्रष्टाचाराचा आरोप

By admin | Updated: August 10, 2016 02:40 IST

सावनेर पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी माणिक हिमाने यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत वृक्ष लागवड

कारवाईची मागणी : बोगस शिक्क्यांचा वापर खापरखेडा : सावनेर पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी माणिक हिमाने यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत वृक्ष लागवड दाखवून दीड लाख रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर चौधरी यांनी केला आहे. सदर आरोप सूडबुद्धीने केले जात असल्याची प्रतिक्रिया बीडीओ हिमाने यांनी दिली. किशोर चौधरी यांची पत्नी दहेगाव (रंगारी)च्या सरपंच आहेत. त्यांच्या कार्यकाळात २०१५ - १६ आणि २०१६ - १७ या आर्थिक वर्षांत दहेगाव (रंगारी) येथे ६०० रोपट्यांची लागवड करण्यात आल्याचे कागदोपत्री दर्शविण्यात आले. यासाठी खोटे हजेरीपट व सरपंच आणि सचिवाचे खोटे शिक्के तयार करण्यात आले. या खोट्या हजेरीपट व शिक्क्यांचा वापर करून रकमेची उचल करण्यात आली. सदर हजेरीपट खरे असल्याचे प्रमाणित करण्यात आले. असा प्रकार संपूर्ण सावनेर तालुक्यात सुरू आहे, असा गंभीर आरोप किशोर चौधरी यांनी केला. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणीही त्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी कादंबरी बलकवडे यांच्याकडे केली आहे. किशोर चौधरी यांच्या या तक्रारीमुळे पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. त्यातच उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.या संदर्भात खंडविकास अधिकारी माणिक हिमाने यांनी सांगितले की, आपण कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार केला नाही. दहेगाव (रंगारी) ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामविकास अधिकारी ओतकर कार्यरत आहेत. आपण जेव्हाही दहेगाव (रंगारी) ग्रामपंचायत कार्यालयाला भेट दिली, तेव्हा ते भेटले नाही. त्यामुळे त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविला. (प्रतिनिधी)