शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

आई-वडील गेल्याने चारही मुलींचा गेला आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:08 IST

जलालखेडा : नरखेड तालुक्यातील शेवटच्या टोकावर पहाडी भागात वसलेले रामपुरी हे एक छोटेसे गाव. येथील विनायक उईके (५२) यांचा ...

जलालखेडा : नरखेड तालुक्यातील शेवटच्या टोकावर पहाडी भागात वसलेले रामपुरी हे एक छोटेसे गाव. येथील विनायक उईके (५२) यांचा शुक्रवारी अल्पशा आजाराने मृत्यू झाला. उईके यांना चार मुली असून पत्नी रेखाचे दोन वर्षांपूर्वी आजाराने निधन झाले होते. तेव्हापासून विनायक मोलमजुरी व शेती करून मुलींचा सांभा‌ळ करत होते. परंतु, नियतीला ते मान्य नव्हते. शुक्रवारी अल्पशा आजाराने त्यांचेसुद्धा निधन झाले. वडिलांच्या अचानक जाण्याने मुलींवर दु:खाचा डोंगर कोसळला. दोन वर्षांपूर्वी आई गेल्याने वडिलांचा त्यांना आधार होता. ते दु:ख विसरत नाही तर वडिलांचे निधन झाले. चारही मुली वडिलांना कामाला हातभार लावत शिक्षण घेत होत्या. वडील गेल्याने मुलींचे काय होईल? त्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करता येईल का, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. गत वर्षभरापासून कोरोनामुळे सामान्य व्यक्तीची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे. हाताला काम नाही. अशा कठीण काळात वडील गेल्याने मुलींवर मोठी बिकट परिस्थिती ओढवली आहे. या घटनेची माहिती मिळताच पंचायत समिती सदस्य मयूर उमरकर यांनी त्या मुलींचे घर गाठले. त्यांना धीर दिला. इतकेच नव्हे तर त्या मुलींना ५ हजार रुपयांची आर्थिक मदत केली. त्या मुलींचा शिक्षणाचा खर्च करणार असल्याचे उमरकर यांनी सांगितले. उमरकर यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे त्या मुली आपले शिक्षण पूर्ण करू शकतील. आपल्या पायावर उभ्या राहतील. अशी मदत समाजाने अडचणीत सापडलेल्यांना करण्याची गरज आहे. सरपंच गौतम इंगळे, उपसरपंच संदीप कोहळे, श्रावणजी बागडे, हेमराज चौधरी, तलाठी वाहने, सचिव गिरीपुंजे व गावातील नागरिक यावेळी उपस्थित होते.

मोठ्या मुलीवर आली परिवाराची जबाबदारी

रामपुरी येथील विनायक उईके यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले. दोन वर्षांपूर्वी आई आणि आता वडील गेल्याने या चारही मुलींवर दु:खाचा डोंगर कोसळला. परंतु, घरातील मोठी व्यक्ती म्हणून शीतल उईके हिच्यावर परिवार सांभाळण्याची जबाबदारी वयाच्या २२ व्या वर्षी आली आहे. तिला तीन बहिणींचा सांभाळ करून संसाराचा गाडा चालवायचा आहे. इतक्या कमी वयात तिच्यावर घर सांभाळण्याची जबाबदारी आली आहे. तीन बहिणींचा सांभाळ करताना तिला स्वत:चे शिक्षणसुद्धा पूर्ण करायचे आहे.