शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

संमेलनाध्यक्ष निवडणुकीसाठी तिन्ही ‘डॉक्टर’ सज्ज!

By admin | Updated: September 23, 2016 03:10 IST

डोंबिवलीला होणाऱ्या ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षाच्या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे.

मतदार यादीची प्रतीक्षा : सोशल मीडियावर मोर्चेबांधणी सुरूशफी पठाण  नागपूर डोंबिवलीला होणाऱ्या ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षाच्या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे. या निवडणुकीसाठी नागपुरातील साहित्याचे तीन चिकित्सक अर्थात डॉक्टर सज्ज झाले असून यातले एक डॉ. मदन कुळकर्णी यांनी तर व्हॉटस् अ‍ॅपवरून आपली उमेदवारी जाहीरही केली आहे. दुसरे दोन डॉक्टर म्हणजे डॉ. अक्षयकुमार काळे व डॉ. रवींद्र शोभणे यांनीही त्यांच्या संभाव्य उमेदवारीच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला आहे. मतदार याद्यांची प्रतीक्षा आहे. त्या हाती आल्या की अर्ज दाखल करण्यासोबतच मतदारांच्या भेटीगाठीचा ‘सिलसिला’ वाढणार आहे. संमेलनाध्यक्षाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सर्वांतआधी ज्येष्ठ समीक्षक व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मराठी विभागाचे माजी प्रमुख डॉ. मदन कुळकणी यांनी आपली उमेदवारी जाहीर केली. यासाठी त्यांनी सोशल मीडियाचा आधार घेत आपल्या स्वहस्ताक्षरातील आवाहनाची एक फोटो कॉपी आपल्या सहकाऱ्यांना व्हॉटस् अ‍ॅपवरून पाठवून दिली. डॉ. अक्षयकुमार काळे व डॉ. रवींद्र शोभणे यांनी अजून सार्वजनिकरित्या निवडणूक लढण्याची इच्छा जाहीर केली नसली तरी त्यादिशेने तयारी सुरू केली आहे. डॉ. मदन कुळकणी पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून ते ही निवडणूक लढणारच असा निर्धारही व्यक्त केला आहे. डॉ. अक्षयकुमार काळे यांनीही पहिल्यांदाच ही निवडणूक लढवण्याचा निश्चय केला आहे. ‘गालिब’च्या निमित्ताने त्यांची अखिल महाराष्ट्र व गुलबर्ग, इंदोर, वडोदा, धारवाड अशी एक अनौपचारिक फेरी पूर्णही झाली आहे. डॉ. रवींद्र शोभणे यांची इच्छा असूनही याआधी त्यांनी दोनदा माघार घेतली होती. आता त्यांची मित्र परिवारात चर्चा सुरू असून यावेळी उमेदवारी जाहीर केली तर कुठल्याही परिस्थितीत ही निवडणूक लढायचीच, या निर्णयाप्रत ते पोहोचले आहेत.