शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

अत्यावश्यक सेवा सोडून शनिवारी-रविवारी सर्वच बंद ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपुरातील कोरोनाची वाढती संख्या लक्षात उद्या शनिवार व रविवारी अत्यावश्यक सेवा वगळून सर्वच ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपुरातील कोरोनाची वाढती संख्या लक्षात उद्या शनिवार व रविवारी अत्यावश्यक सेवा वगळून सर्वच व्यवहार बंद राहतील. प्रशासनाने लॉकडाऊन लावलेला नाही. हा स्वयंस्फूर्त असेल. नागरिकांनी स्वत:च ही जबाबदारी घ्यायची आहे. काही काम नसेल तर घराबाहेर पडू नये. अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर पडा, असे आवाहन पाालकमंत्री नितीन राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना नागरिकांना केले.

यासंदर्भात शुक्रवारी सकाळी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार व जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे हेही उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले, नागपुरात कोरोनाची संख्या वाढत आहे; परंतु अजूनही नागपुरातील परिस्थिती नियंत्रणात आहे. कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा नाही. त्यामुळेच ‘मी जबाबदार’ मोहीम सुरू केली आहे. या विषयातील जे तज्ज्ञ आहेत, त्यांचे म्हणणे आहे की या परिस्थितीत कोविडच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. कोणतेही लक्षण दिसले तर कोविड टेस्ट करून घेणे आवश्यक आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून शनिवार-रविवारी बाजारपेठा बंद करण्यात आल्या आहेत. वाचनालयेसुद्धा ७ मार्चपर्यंत बंद आहेत. शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेसद्वारेही शनिवारी- रविवारी घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले जात आहे. गार्डन, वाॅकिंग प्लाझा, पेट्रोलपंप, जिम, भाजीपाला, फळे, न्यूज पेपर सुरू राहील. शासकीय कार्यालयासह खासगी कार्यालये व सर्व बाजार बंद राहील.

बॉक्स

चाचण्या तीनपटीने वाढल्या; व्हॅक्सिनेशनसाठी पुन्हा ५ हजार नवीन नोंदणी

नागपुरात कोरोनाच्या चाचणी तीनपटीने वाढवल्या आहेत. मुंबईत दररोज ११ हजार टेस्ट होत आहेत. तर नागपुरात दहा हजारांवर चाचण्या होत आहेत. सुपर स्प्रेडरच्या चाचण्यासुद्धा होत आहेत. व्हॅक्सिनेशनसुद्धा होत आहे. ५ हजार नोंदणी पुन्हा नव्याने करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

बॉक्स

कोरोना बेडची संख्या पुरेशी, क्वाॅरंटाइन सेंटरची सध्या आवश्यकता नाही

कोरोना रुग्णांसाठी नागपुरात पुरेशे बेड उपलब्ध आहेत. सध्या रुग्णालयात ऑक्सिजन बेड १७६९ आहेत. आयसीयूचे बेड ६८४ व व्हेंटिलेटरचे बेड २६३ आहेत.

होम क्वाॅरंटाइन असलेल्यांच्या हातांना शिक्के मारले जात आहे. ज्यांना रुग्णालयात भरती व्हायचे आहे ते भरती होऊ शकतात. सध्या क्वाॅरंटाइन सेंटरची गरज नाही, असे पाालकमंत्री राऊत यंनी स्पष्ट केले.

बॉक्स

नागपुरात नवीन स्टेन नाही

कोरोनाची संख्या वाढत असली तरी नागपुरात सध्या तरी कोरोनाचा नवीन स्टेन नाही, असे पालकमंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केले.