शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

खुनातील सर्व आरोपी निर्दोष

By admin | Updated: March 29, 2015 02:33 IST

कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाल येथील राणा सन बारसमोर झालेल्या एका तरुणाच्या खून प्रकरणी ...

नागपूर : कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाल येथील राणा सन बारसमोर झालेल्या एका तरुणाच्या खून प्रकरणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांच्या न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी संशयाचा लाभ देत शुक्रवारी सर्वच चारही आरोपींची निर्दोष सुटका केली. या खून खटल्यातील चारही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार फितूर झाले होते. विश्वजित ऊर्फ सोनू जाधव रा. कर्नलबाग, सीताराम शाहू रा. लालगंज, रंजीश ऊर्फ रॉकी जाधव रा. सोमवारीपेठ आणि आशिष शिर्के रा. महाल, अशी आरोपींची नावे आहेत. राहुल ऊर्फ रानू विनोदराव गाढवे रा. सिरसपेठ तेलीपुरा, असे मृताचे नाव होते. सरकार पक्षानुसार खुनाची घटना २० मे २०१३ रोजी रात्री ९.४५ वाजताच्या सुमारास घडली होती. जुन्या वैमनस्यातून रॉकीने आपल्या दुचाकी वाहनावर राहुल गाढवे याला बसवून राणा सन समोर आणले होते. त्यानंतर रॉकी आणि त्याच्या साथीदारांनी चाकू आणि सुरीने वार करीत त्याचा खून केला होता. मृताचा भाऊ वैभव गाढवे याच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून चारही आरोपींना अटक केली होती. या प्रकरणाचा तपास चंद्रकांत निरावडे यांनी करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी चार प्रत्यक्षदर्शी साक्षीदार फितूर झाले होते. आरोपींनी आपणासमक्ष राहुल गाढवे याला मारले नाही. आरोपी त्याला मारत असल्याचे आम्ही पाहिलेही नाही, असे त्यांनी साक्ष देताना न्यायालयाला सांगितले होते. संशयाचा लाभ मिळून आरोपी निर्दोष ठरले. न्यायालयात बचाव पक्षाच्या वतीने अ‍ॅड. चंद्रशेखर जलतारे, अ‍ॅड. डी. एस. श्रीमाळी आणि अ‍ॅड. चेतन ठाकूर यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)