शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

‘अलिना’ने कोट्यवधींनी लुबाडले!

By admin | Updated: December 5, 2015 09:09 IST

गुंतवणूक करा आणि दर महिन्याला निश्चित पगार कमवा, असे आमिष दाखवून एका महिलेने पाच हजारावर लोकांची कोट्यवधीने फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे.

नागपूर : गुंतवणूक करा आणि दर महिन्याला निश्चित पगार कमवा, असे आमिष दाखवून एका महिलेने पाच हजारावर लोकांची कोट्यवधीने फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे. हेमलता राकेश चिरकुटे (३५) असे आरोपी महिलेचे नाव असून हुडकेश्वर पोलिसांनी शुक्रवारी या महिलेला अटक केली.दरम्यान महिलेच्या आम्रपालीनगर, हुडकेश्वर रोड येथील कार्यालयावर हजारो गुंतवणूकदारांनी शुक्रवारी हल्ला करून तोडफोड केली. संतप्त जमावाने पोलीस ठाण्यावरही दगडफेक केली. त्यामुळे परिसरात दिवसभर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, हेमलता चिरकुटे हिने वर्षभरापूर्वी आम्रपालीनगर २, बसस्टॉप, हुडकेश्वर रोड येथे ‘अलिना एम्प्लॉयमेंट रिसोर्सेस’ फर्म स्थापन केली. या माध्यमातून तिने लोकांना गुंतवणूक करून घरबसल्या लहानमोठी कामे करून दर महिन्याला पगार कमाविण्याचे आमिष दाखविले. येथे गुंतवणूक करणाऱ्यांनाच तिने एजन्टही बनविले आणि या फर्मची घरोघरी जाऊन जाहिरात केली. ज्यांनी जितकी गुंतवणूक केली, त्याप्रमाणात पगार देण्याचे आश्वासन दिले. या आमिषाला बळी पडणाऱ्यांमध्ये महिलांची संख्या अधिक होती. पतीला चोरून किंवा स्वकमाईने जमविलेले पैसे महिलांनी या फर्ममध्ये गुंतविले. विश्वास संपादन करण्यासाठी सुरुवातीला तिने लोकांना ठरल्याप्रमाणे पगार दिला. काही महिन्यापूर्वी गुंतवणुकीचा आकडा ५० हजार ते १ लाख रुपयापर्यंत वाढविण्यात आला. लोकांनी ५ हजारापासून ते ८ लाख रुपयापर्यंत गुंतवणूक केल्याचे सांगण्यात येत आहे. पीडितांनी सांगितल्याप्रमाणे गेल्या तीन महिन्यापासून आरोपी हेमलताने हे ना ते कारण सांगून लोकांचे पैसे परत करणे बंद केले. यादरम्यान गुंतवणूकदाराकडून पैसे घेण्याचे काम सुरूच होते. मागणी केल्यावर हेमलताने लोकांना खोटे चेक दिले जे बाऊंस झाले. बँकेत जमा करण्याचे सांगून पासबुक घेतले, मात्र खात्यावर पैसे जमा केले नाही.गरीब, मध्यमवर्गीय ठरले बळीहेमलता चिरकुटेच्या आमिषाला गरीब व मध्यमवर्गीय लोक बळी ठरले. यात महिलांचा समावेश अधिक आहे. ‘लोकमत’शी बोलताना या महिलांनी आपली व्यथा सांगितली. घरकाम करणाऱ्या, मोलमजुरी करणाऱ्या, लग्न समारोहात काम करणाऱ्या महिलांपासून अशा वर्कर, अंगणवाडी सेविकांनी पैसे भरले. काहींनी पतीला चोरून पैसे गुंतविले. त्याहून वाईट म्हणजे अनेकांनी उधारी घेऊन दागिने किंवा प्लॉट गहाण ठेवून पैसे गुंतविल्यांचीही संख्या बरीच आहे. जीवनाची कमाई बुडाल्याच्या दु:खाने अनेकांच्या डोळ्यातील पाणी थांबत नव्हते. दीड महिन्यांपूर्वीच पोलिसांना सुगावासूत्राने दिलेल्या महितीनुसार, एका दक्ष नागरिकाने दीड महिन्यांपूर्वी गुन्हे शाखा पोलिसांना याबाबत अवगत केले होते. गुन्हे शाखेने हा तपास अर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविला होता. त्यांचा तपास सुरू करून कुणीही गुंतवणूक करूनये, असे आवाहनही करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. हेमलताने हुडकेश्वरपूर्वी पारडी येथे अशाच प्रकारची फर्म उघडली होती, अशी माहिती समोर येत आहे. हेमलता पतीपासून विभक्त राहते, मात्र सासू-सासरे तिच्यासोबत असून एक मुलगाही असल्याची माहिती आहे.तक्रारीनंतर हेमलता होती फरार नागपूर : १ डिसेंबरला तक्रार दाखल झाल्यानंतर हेमलता चिरकुटे फरार झाली. यादरम्यान कार्यालयासमोर नोटीस लावून तिने शुक्रवारी १ नोव्हेंबर ते ४ डिसेंबरपर्यंत पैसे भरलेल्या गुंतवणूकदारांचे पैसे देणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे सकाळी ४ वाजतापासून लोकांनी कार्यालयासमोर गर्दी केली. मात्र ती कार्यालयात आलीच नाही, त्यामुळे लोकांचा असंतोष भडकला. लोकांनी अलिना कार्यालयाची तोडफोड केली. या परिसरात प्रचंड तणाव होता.आॅफिसच्या मागेच हेमलताचे घर आहे. लोकांनी तिच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र ११ वाजताच्या दरम्याने एसीपी बाबासाहेब बुधवंत यांच्या नेतृत्वात हुडकेश्वर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जमावाचा असंतोष बघता दंगा विरोधी पथकालाही पाचारण करण्यात आले. पोलिसांनी हेमलता चिरकुटेला अटक केल्याचे बुधवंत यांनी जाहीर केले. मात्र लोकांना पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. दरम्यान अटक झाल्यानंतर आरोपी हेमलताला पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले. त्यामुळे जवळपास दीड हजार लोकांनी पोलीस स्टेशन गाठले. आरोपी हेमलताला लोकांच्या स्वाधीन करण्याची मागणी करीत पोलीस स्थानकासमोर नारेबाजी करीत दगडफेकही केली. त्यामुळे पोलीस शिपाई प्रकाश लुंगे यांना दुखापत झाली. पोलिसांनी यात तीन लोकांना पकडल्याचे सांगण्यात येत आहे.(प्रतिनिधी)सर्व दिशेने होणार तपास या प्रकरणात आता केवळ एकमेव हेमलता चिरकुटेलाच अटक करण्यात आली आहे. मात्र यात मोठे रॅकेट असल्याची शक्यता नाकारता येत नाही. आरोपीने मुंबईलाही पैसे गुंतविल्याचे बोलले जात आहे. मात्र ते कुठे गुंतविले याची सध्यातरी काही माहिती नाही. यामध्ये आणखी कुणी गुंतले आहेत काय, याबाबत विचारपूस सुरू आहे. पोलिस सर्व दिशेने तपास करणार.-बाबासाहेब बुधवंत, सहायक पोलीस आयुक्त