शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्याची अवनी राज्यात टॉप

By admin | Updated: June 18, 2014 01:29 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत अकोला येथील बाल शिवाजी शाळेची विद्यार्थिनी अवनी रामदास खोडकुंभे हिने

विक्रमी निकालात मुलींचा दबदबा: दहावीत ८८़३२% विद्यार्थी उत्तीर्ण नागपूर: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत अकोला येथील बाल शिवाजी शाळेची विद्यार्थिनी अवनी रामदास खोडकुंभे हिने ४९६ (९९.२० टक्के) गुण मिळवीत राज्यात पहिले स्थान पटकाविले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा येथील देऊळगावराजा विद्यालयाचा प्रणय गोपाळराव करपे हा ४९५ (९९ टक्के) गुण घेत विदर्भात दुसरा तर अकोला येथील ज्योती जानोरकर विद्यालयाची प्राची मधुकर जानोरकर तर नागपूर येथील पंडित बच्छराज व्यास विद्यालयाचा शुभम पाटील यांनी ४९४ (९८.८० टक्के) गुण मिळवीत तिसरे स्थान पटकाविले आहे. या परीक्षेत नागपूर विभागाचा निकाल ८२.९३ टक्के तर अमरावती विभागाचा निकाल ८४.११ टक्के लागला आहे. नागपूर विभागातून ८२.९३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून मागील वर्षीच्या तुलनेत निकालात यंदा ८.९४ टक्के वाढ झालेली आहे. राज्यातील मंडळांच्या क्रमवारीत विभागाचा शेवटून दुसरा क्रमांक आहे. मंगळवारी दुपारी १ वाजता नागपूर विभागाचा निकाल जाहीर करण्यात आला. राज्य शिक्षण मंडळाचे नागपूर विभागीय सचिव अनिल पारधी यांनी निकालाची घोषणा केली. पंडित बच्छराज व्यास विद्यालय येथील धनश्री पुंजाराम पाठे व साऊथ पॉईन्ट शाळा येथील मीनल खानोरकर या विद्यार्थिनींनी ९८.६० टक्के (४९३) गुणांसह संयुक्तरीत्या दुसरे स्थान पटकाविले. तर सोमलवार रामदासपेठ शाळेची रिया घोडे व प्रेरणा हायस्कूल येथील प्रगती हिंगे या ९८.४० टक्के (४९२) गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या. दहावीच्या परीक्षेत नागपूर विभागातून १,७६,४०० नियमित विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यांच्यापैकी १, ४५, ५५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नागपूर विभागातून ८९,०५२ पैकी ७४,३१९ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. त्यांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८५.३९ टक्के इतकी आहे. तर विद्यार्थ्यांचे प्रमाण ८०.५० टक्के इतके आहे. विभागातून २१,३६५ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले असून ४८,५५१ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होण्यात यश मिळविले आहे. नागपूर जिल्ह्याचा निकाल ८९.७९ टक्के लागला असून सर्वात कमी निकाल भंडारा जिल्ह्याचा (७४.६९) लागला आहे. माध्यमिक शाळांना २६ जून रोजी गुणपत्रिकेचे वाटप करण्यात येईल. अमरावती विभागअमरावती विभागातून ८८.०१ टक्के निकालासह वाशीम जिल्हा अव्वल ठरला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा निकालाची टक्केवारी १० ने वाढली आहे. विभागातून परीक्षेला १ लाख ६४ हजार १०३ विद्यार्थी बसले होते. यामधून १ लाख ३८ हजार ०२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विभागाचा निकाल ८४.११ टक्के लागला आहे. अमरावती जिल्ह्यातून सुमारे ४३ हजार ४७३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ३५ हजार ८८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्याची निकालाची टक्केवारी ८२.५४ टक्के इतकी आहे. अमरावती जिल्ह्यात दर्यापूर येथील प्रबोधन हायस्कूलचे वैभव कडू व राज गावंडे जिल्ह्यातून प्रथम आले आहेत. त्यांना ९८.२० टक्के गुण मिळाले तर अमरावती येथील सेंट फ्रान्सीस हायस्कूलचा शुभम करवा दुसऱ्या स्थानावर आहे. त्याला ९८ टक्के गुण मिळाले. यवतमाळ येथील लो.बा. अणे विद्यालयाचा जसवंतसिंग पवार याला ९८.२० टक्के गुण मिळाले. तो जिल्ह्यातून प्रथम क्रमांकावर आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत अकोला येथील बाल शिवाजी शाळेची विद्यार्थिनी अवनी रामदास खोडकुंभे ही ४९६ (९९.२0 टक्के) गुण घेऊन अमरावती विभागातून प्रथम आली आहे. तर बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा येथील देऊळगावराजा विद्यालयाचा प्रणय गोपाळराव करपे हा ४९५ (९९ टक्के) गुण घेत विभागातून दुसरा तर अकोला येथील ज्योती जानोरकर विद्यालयाची प्राची मधुकर जानोरकर ही ४९४ (९८.८० टक्के) गुण मिळवीत तृतीय क्रमांकावर आहे. या परीक्षेत अमरावती विभागाचा निकाल ८४.११ टक्के लागला. अमरावती जिल्ह्यात दर्यापूर येथील प्रबोधन हायस्कूलचे वैभव कडू व राज गावंडे जिल्ह्यातून प्रथम आले आहेत. त्यांना ९८.२० टक्के गुण मिळाले तर अमरावती येथील सेंट फ्रान्सीस हायस्कूलचा शुभम करवा दुसऱ्या स्थानावर आहे. त्याला ९८ टक्के गुण मिळाले. यवतमाळ येथील लो.बा. अणे विद्यालयाचा जसवंतसिंग पवार याला ९८.२० टक्के गुण मिळाले. तो जिल्ह्यातून प्रथम क्रमांकावर आहे. अमरावती विभागातून ८८.०१ टक्के निकालासह वाशीम जिल्हा अव्वल ठरला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा निकालाची टक्केवारी १० ने वाढली आहे. विभागातून परीक्षेला १ लाख ६४ हजार १०३ विद्यार्थी बसले होते. यामधून १ लाख ३८ हजार ०२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विभागाचा निकाल ८४.११ टक्के लागला आहे. अमरावती जिल्ह्यातून सुमारे ४३ हजार ४७३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ३५ हजार ८८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्याची निकालाची टक्केवारी ८२.५४ टक्के इतकी आहे. अकोला जिल्ह्यातील २६ हजार ६३३ परीक्षार्थ्यांपैकी २१ हजार ५०५ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. जिल्ह्याची निकालाची टक्केवारी ८०.७५ इतकी आहे. बुलडाणा जिल्ह्यातील ३८ हजार ४१७ विद्यार्थ्यांपैकी ३३ हजार २६१ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. जिल्ह्याचा निकाल ८६.५८ टक्के लागला आहे. यवतमाळ जिल्ह्यातून ३७ हजार ०१९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ३१ हजार ४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले यवतमाळचा निकाल ८३.८५ टक्के लागला आहे. वाशिम जिल्ह्यातील १८ हजार ५६१ विद्यार्थ्यांपैकी १६ हजार ३३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यवतमाळचा निकाल ८८.०१ टक्के लागला आहे. अमरावती विभागातून १ लाख ३८ हजार २३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यापैकी ७१ हजार ६४८ विद्यार्थी आणि ६६ हजार ३७५ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. मागील वर्षी अमरावती विभागाचा निकाल ७४.७ टक्के लागला होता. यंदा निकालामध्ये १० टक्क्यांनी वृद्धी झाली आहे. (प्रतिनिधी)