शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

अजनी-पुणे रेल्वेगाडीच्या प्रवाशांचा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 00:49 IST

दिवाळीनिमित्त प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वे प्रशासनाने अजनी-पुणे स्पेशल रेल्वेगाडीची घोषणा केली होती.

ठळक मुद्देआठ तास लेट : वाट पाहून प्रवासी वैतागले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिवाळीनिमित्त प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वे प्रशासनाने अजनी-पुणे स्पेशल रेल्वेगाडीची घोषणा केली होती. त्यानुसार ही गाडी सोमवारी दुपारी ४.१५ वाजता अजनी स्थानकावरून सुटणार होती. परंतु ही गाडी रात्री १२.१५ वाजेपर्यंत सुटली नसल्यामुळे या गाडीने प्रवास करणाºया प्रवाशांनी अजनी रेल्वेस्थानकावर एकच गोंधळ घातला.रेल्वे प्रशासनाने २३ आॅक्टोबरला अजनी-पुणे या विशेष रेल्वेगाडीची घोषणा केली होती. पुण्याला जाणाºया प्रवाशांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यामुळे या गाडीचे आरक्षण फुल्ल झाले होते. सोमवारी या गाडीने प्रवास करणारे प्रवासी गाडीच्या नियोजित वेळी अजनी रेल्वेस्थानकावर पोहोचले. परंतु गाडी प्लॅटफार्मवर लागली नाही. प्रवाशांनी चौकशी केली असता, त्यांना पुण्यावरून गाडी आली नसल्याचे सांगण्यात आले. अखेर रात्री ८.३० वाजता ही गाडी पुण्यावरून आली. मात्र, देखभालीसाठी ही गाडी अजनी यार्डात पाठविण्यात आली. रात्री १२.१५ पर्यंत ही गाडी प्लॅटफार्मवर लागली नसल्यामुळे प्रवाशांनी अजनी स्थानकावर गोंधळ घातला होता. प्रवाशांच्या गोंधळामुळे लोहमार्ग पोलीस आणि अजनी रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांचा ताफा अजनी स्थानकावर तैनात करण्यात आला होता.सलग दुसºया दिवशी तीच चूकरविवारी रेल्वेगाडी क्रमांक ०१०७६ नागपूर-मुंबई ही विशेष रेल्वेगाडी नागपूर रेल्वेस्थानकावरून सुटणार होती. परंतु ही गाडी दोन तास होऊनही प्लॅटफार्मवर न लागल्यामुळे प्रवाशांनी गोंधळ घातला होता. अखेर रात्री ९.३० वाजता ही गाडी मुंबईकडे रवाना झाली होती. सलग दोन दिवस रेल्वे प्रशासनाने ही घोडचूक केल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.