शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

अजनीत गँगरेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अजनीतील कुख्यात गुंडांच्या टोळीने सामूहिक अत्याचार केल्याची तक्रार एका १६ वर्षीय मुलीने केली. मंगळवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अजनीतील कुख्यात गुंडांच्या टोळीने सामूहिक अत्याचार केल्याची तक्रार एका १६ वर्षीय मुलीने केली. मंगळवारी सायंकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत तिच्या बयाणात वारंवार विसंगती येत असल्यामुळे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाकडे लक्ष घातले. दरम्यान, वृत्त लिहिस्तोवर या प्रकरणात गुन्हा दाखल झाला नव्हता.

तक्रार करणारी मुलगी १६ वर्षांची असून तिने पोलिसांना सांगितलेल्या माहितीनुसार, आज दुपारी ४ च्या सुमारास एका मैत्रिणीसोबत ती मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडकडे गेली. तेथे तिच्यावर चौघांनी बलात्कार केला. तिला जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर मुलगी अजनी पोलीस ठाण्यात पोहचली. अजनीतील कुख्यात लोखंडे टोळीतील कुख्यात अमित, प्रशिक, दत्तू सह आणखी एकाने शस्त्राच्या धाकावर बलात्कार केल्याचे तिने सांगितले. दरम्यान, अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याच्या वृत्ताने सर्वत्र खळबळ उडाली. ठाणेदार विनोद चौधरी यांनी दिलेल्या माहितीनंतर पोलीस उपायुक्त अक्षय शिंदे, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. दिलीप झळके यांनीही या प्रकरणातील तक्रारदार मुलीची बारकाईने विचारपूस केली. दरम्यान, मुलीच्या बयाणात वारंवार विसंगती येत असली तरी आरोपी कुख्यात गुंड असल्यामुळे पोलिसांनी त्यांना शोधण्यासाठी वेगवेगळ्या भागात पथके रवाना केली. वृत्त लिहिस्तोवर या प्रकरणात गुन्हा दाखल झाला नव्हता.

---

विशेष म्हणजे अजनीतील रामटेके आणि लोखंडे या टोळीतील गुंडांमध्ये टोकाचे वैमनस्य आहे. काही महिन्यांपूर्वी रामटेके टोळीतील गुंडांवर असाच एक सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. आज तक्रार दाखल करताना रामटेके टोळीतील गुंड पोलीस ठाण्याच्या अवतीभवती घुटमळत होते. त्यामुळे या प्रकरणाच्या संबंधाने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

--