शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
2
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
3
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
4
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
5
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
6
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
7
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
8
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
9
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
10
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
11
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
12
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
13
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
14
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
15
आम्हाला तोंड उघडण्यास भाग पाडू नका; ईडी.. तुमचा राजकीय वापर का हाेतोय?
16
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
17
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
18
मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या इमारतीसाठी जमीन ताब्यात!
19
शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका
20
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा

अजनीत दारुचा साठा पकडला

By admin | Updated: February 19, 2017 02:16 IST

अजनी पोलिसांनी रहाटेनगर टोली वस्तीत शुक्रवार आणि शनिवारी गावठी दारू विक्रेत्यांविरुद्ध धाडसत्र राबवून पाच ठिकाणांहून

पोलिसांची धडक कारवाई : पाच जणांना अटक नागपूर : अजनी पोलिसांनी रहाटेनगर टोली वस्तीत शुक्रवार आणि शनिवारी गावठी दारू विक्रेत्यांविरुद्ध धाडसत्र राबवून पाच ठिकाणांहून ५ हजार लिटर दारू जप्त केली. या प्रकरणी तीन महिलांसह पाच जणांना पोलिसांनी अटक केली. महापालिका निवडणुकीच्या मतदानाचा दिवस जवळ येत असल्यामुळे अनेकांकडून विविध झोपडपट्ट्यांमध्ये गावठी दारू पोहचविली जात आहे. त्यामुळे ही दारू गाळणारे आणि विकणाऱ्यांनी मोठा साठा जमविणे सुरू केले आहे. अशाच प्रकारे रहाटे टोलीतील दारू विक्रेत्यांनी दारूचा मोठा साठा जमविल्याची माहिती अजनी पोलिसांना कळाली. त्यावरून शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी पूनम संजय मानकर (वय ३०, रा. शंकर मंदिराजवळ, रहाटे टोली) हिच्या घरी धाड घातली. तिने आणि तिच्या साथीदारांनी जमिनीत खड्डे करून ड्रम आणि माठात मोहाफुलांचा सडवा, कच्चा माल, आणि ९५० लिटर गावठी दारू लपवून ठेवली होती. ही दारू तसेच दारू गाळण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. पोलिसांनी यावेळी पूनम मानकर हिला अटक केली. त्याचप्रमाणे शनिवारी याच भागातील सुमन देशीलाल मानकर (वय ५५), मंजुळाबाई चठ्ठासिंग लोंडे (वय ४५), अंकुश मोहन देशपांडे (वय ४५) आणि विनोद लक्ष्मणराव भोयर (वय ३६) या ठिकाणी धाडी घातल्या. येथेही पोलिसांना जमिनीत ड्रम आणि माठ गाडून त्यात गावठी दारू गाळण्यासाठी बनविलेला सडवासह ३९५० लिटर दारूसाठा आढळला. पोलिसांनी हा ३ लाख, ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. (प्रतिनिधी) रेल्वेस्थानकावरही कारवाई रेल्वे सुरक्षा दलाने नागपूर रेल्वेस्थानकावर ८४०० रुपये किमतीच्या देशी दारूच्या ३५० बॉटल्स जप्त करून उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन केल्या. रेल्वे सुरक्षा दलाचा जवान अर्जुन सिंह यास रेल्वेस्थानकावर दारूची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्याने याची सूचना आरपीएफचे निरीक्षक वीरेंद्र वानखेडे यांना दिली. त्यांनी आरपीएफचे कमांडंट ज्योती कुमार सतीजा यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कृष्णानंद राय, होतीलाल मीना, दिलीप कुमार, अर्जुन सिंह, आर. एल. गुर्जर, विकास शर्मा, बिक्रम यादव, उत्पादन शुल्क विभागाचे प्रभारी निरीक्षक डी. पी. वरठी, एस. एस. मानकर, ए. आर. बोथले यांची चमू गठित केली. या चमूने नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक २ वर संयुक्तरीत्या धाड टाकली. यावेळी इटारसी एण्डकडील भागात एक बॅग बेवारस अवस्थेत आढळली. आजूबाजूच्या प्रवाशांना विचारणा केली असता कुणीच या बॅगवर आपला हक्क सांगितला नाही. या बॅगची तपासणी केली असता त्यात देशी दारूच्या ८४०० रुपये किमतीच्या ३५० बॉटल आढळल्या.