शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

अजनी रेल्वे पुलावर रोज होतो अनेकांच्या जीविताशी खेळ; ॲम्ब्युलन्सही अडकून पडतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2022 21:10 IST

Nagpur News अजनी रेल्वे पुलावर वाहतुकीच्या कोंडीमुळे रोज अनेकांच्या जीविताशी खेळ होत आहे. गंभीर अवस्थेतील रुग्ण घेऊन मेडिकलकडे येणाऱ्या अनेक रुग्णवाहिका येथे रोज अडकून पडतात.

ठळक मुद्देरोजच होतो सकाळ, सायंकाळी त्राससंबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

नरेश डोंगरे !

नागपूर : अजनी रेल्वे पुलावर वाहतुकीच्या कोंडीमुळे रोज अनेकांच्या जीविताशी खेळ होत आहे. गंभीर अवस्थेतील रुग्ण घेऊन मेडिकलकडे येणाऱ्या अनेक रुग्णवाहिका येथे रोज अडकून पडतात. अत्यंत गंभीर असा हा प्रकार अनेकांसाठी प्रचंड मनस्तापाचा विषय ठरला आहे. मात्र, हा सर्व प्रकार लक्षात येऊनही त्याकडे संबंधित अधिकारी लक्ष द्यायला तयार नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

अजनीचा पूल जड वाहनांच्या वाहतुकीसाठी धोक्याचा आहे. त्यामुळे या पुलावरून जड वाहने जाऊ नये म्हणून पुलाच्या दोन्ही बाजूला विशिष्ट अंतरावर लोखंडी पोल रोवण्यात आले. कार, जीप व अशीच लाईट वेट वाहने त्या पोलमधून जातील, अशी ही व्यवस्था आहे. मात्र, या व्यवस्थेने रोज हजारो नागरिकांचा त्रास वाढवला आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला शाळा, महाविद्यालय आहे. एका बाजूला रेल्वेस्थानक तसेच अनेक सरकारी आणि खासगी कार्यालये तर दुसऱ्या बाजूला मेडिकल आणि विविध कार्यालये आहेत. त्यामुळे रोज सकाळी १० वाजता आणि सायंकाळी ५.३० वाजतापासून वाहनचालकांची प्रचंड वर्दळ असते. सकाळी ही वर्दळ लवकर संपत असली तरी सायंकाळी मात्र रात्री ९ ते १० वाजेपर्यंत पुलावर आणि पुलाच्या दोन्ही बाजूला शेकडो वाहने मुंगीच्या गतीने सरकतात. त्यामुळे महत्त्वाचे काम करण्यासाठी निघालेल्यांना या कोंडीत अडकून पडल्यामुळे प्रचंड त्रास होतो. गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रकार रोजचाच झाला आहे.

पोलिसांच्या नियंत्रणाबाहेरची स्थिती

विशेष म्हणजे, मेडिकलमध्ये दूरदूरवरून अनेक अत्यवस्थ अवस्थेतील रुग्णांना घेऊन दिवसभरात शंभरावर रुग्णवाहिका येतात. सायंकाळी अनेक रुग्णवाहिका वाहनांच्या गर्दीत अडकून पडतात. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाइकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी येथे ट्रॅफिक पोलीस असतात. मात्र, टी-पॉईंट असलेल्या या पुलावर वाहनांची संख्या एवढी मोठी असते की स्थिती पोलिसांच्या नियंत्रणाबाहेर जाते. त्यामुळे गंभीर अवस्थेतील रुग्णांच्या नातेवाइकांसाठी हा प्रकार फारच वेदनादायी ठरला आहे.

मोठा धोका होण्याची भीती

जड वाहनांच्या वजनामुळे पुलावर धोका होण्याची भीती असल्याने महापालिकेने येथे ही उपाययोजना केली असल्याचे पोलीस अधिकारी सांगतात. मात्र, अनेक छोट्या-मोठ्या, कार, जीप, दुचाकी आणि अशीच काही वाहने एकाच वेळी या पुलावर जमा होऊन रेंगाळत असल्याने त्यांच्या वजनाने या पुलावर एखाद वेळी मोठा धोका होऊ शकतो. संबंधित अधिकाऱ्यांच्या लक्षात हा धोका वारंवार येऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. दुर्घटना घडल्यावरच संबंधित प्रशासन याबाबत उपाययोजना करेल का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

----

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी