शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अजब बंगल्याचा गजब कारभार : दोनच निविदा तरीही दिले कंत्राट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 14:03 IST

आऊटसोर्सिंगने (बाह्ययंत्रणेद्वारे) करावयाच्या पदभरतीसंदर्भात अभिरक्षक मध्यवर्ती संग्रहालय (अजब बंगला) यांनी दिलेली पहिली निविदा तांत्रिक पेचात फसली. मात्र दुसऱ्या निविदेत (अवैध निविदा) पहिल्या निविदेच्या मूळ प्रारुपात बदल करण्यात आल्याने ही निविदाही अडचणीत आली आहे.

ठळक मुद्देसरकारचा निर्णय केवळ सोयीपुरता

जितेंद्र ढवळेआॅनलाईन लोकमतनागपूर : आऊटसोर्सिंगने (बाह्ययंत्रणेद्वारे) करावयाच्या पदभरतीसंदर्भात अभिरक्षक मध्यवर्ती संग्रहालय (अजब बंगला) यांनी दिलेली पहिली निविदा तांत्रिक पेचात फसली. मात्र दुसऱ्या निविदेत (अवैध निविदा) पहिल्या निविदेच्या मूळ प्रारुपात बदल करण्यात आल्याने ही निविदाही अडचणीत आली आहे.राज्य सरकारच्या शासन निर्णय क्रमांक सीएटी २०१७ /प्र क्र ८ / इमा-२ चा मध्यवर्ती संग्रहालयाने आपल्या सोयीपुरता उपयोग केल्याचा आरोप नागपुरातील बेरोजगार संघटनांकडून केला जात आहे. मध्यवर्ती संग्रहालयाने ६ नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या आॅनलाईन निविदेच्या अटीत व शर्तीत बदल केला आहे. याही निविदेत संग्रहालयाने समन्वयक (सहायक अभिरक्षक) हे पद भरावयाचे असल्याचा उल्लेख केला आहे. मात्र या पदाचे देय वेतन किती असेल, याचा उल्लेख नाही. याचा मूळ निविदेत मात्र उल्लेख आहे. त्यामुळे निविदा भरताना कंत्राटदाराने कोणते वेतन गृहित धरले असावे, हाही एक प्रश्न आहे.मुळात शासन निर्णय १२ एप्रिल २०१७ नुसार दुसरी निविदा काढताना मूळ प्रारूप निविदेमध्ये कुठलाही बदल करू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. मूळ प्रारूप निविदेत कुठलाही बदल न केल्यास नवीन केलेली मागणी ही द्वितीय मागणी समजण्यात येईल, असेही यात नमूद करण्यात आले आहे. मात्र ६ नोव्हेंबर २०१७ मध्यवर्ती संग्रहालयाने जारी केलेल्या निविदेत अटी-शर्र्ती आणि मूळ प्रारूपात बदल केला आहे. त्यामुळे या निविदेची ही दुसरी वेळ होती, असे म्हणणे चुकीचे होईल. कायदेशीररीत्या ही निविदा प्रथमच हवी होती. असे असतानाही ६ नोव्हेंबर २०१७ रोजी जारी केलेल्या आॅनलाईन निविदेच्या आधारावर मध्यवर्ती संग्रहालयाकडे दोन कंत्राटदारांनी निविदा सादर केल्या होत्या. यात पहिली संस्था नागपुरातील पंचदीप विकास सेवा सहकारी संस्था तर दुसरी शिवशक्ती बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था अशी आहे. या दोन्ही संस्थांनी सादर केलेल्या निविदाही सारख्या दराच्याच आहेत. मुळात जोपर्यंत किमान तीन पात्र कंत्राटदार प्राप्त होत नाही, तोपर्यंत पुनश्च प्रथम, द्वितीय व तृतीय मागणी करण्यात यावी, असा शासन निर्णयात स्पष्ट उल्लेख आहे. मात्र मध्यवर्ती संग्रहालय प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करीत या दोन्ही निविदा तांत्रिक बिडमध्ये मान्य केल्या आहेत. यानंतर १५ नोव्हेंबर २०१७ रोजी पंचदीप विकास सेवा सहकारी संस्थेला आऊटसोर्सिंग पद्धतीने डाडा एन्ट्री आॅपरेटर - २ पदे, पहारेकरी-३ पदे, माळी-१ आणि शिपाई-३ पदे पुरविण्याचे कंत्राट देण्यात आले. मात्र मध्यवर्ती संग्रहालयाने ६ नोव्हेंबर रोजी प्रकाशित केलेल्या निविदा अर्जात समन्वय (सहायक अभिरक्षक) हे पदभरावयाचे असल्याचा उल्लेख केला होता. तो या ठिकाणी वगळण्यात आला आहे. त्यामुळे अशाप्रकारची निविदा कायदेशीररीत्या किती वैध आहे, याचे उत्तर अभिरक्षक मध्यवर्ती संग्रहालय यांनी देणे गरजेचे आहे.वेतन काल्पनिक कसेशासकीय निविदा कधी काल्पनिक नसतात. त्या तांत्रिक आणि आर्थिकदृष्ट्या योग्य असल्याच पाहिजे. निविदा जाहीर करणाऱ्याने आणि निविदा सादर करणाऱ्या ने शासकीय नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. मात्र मध्यवर्ती संग्रहालयाने आऊटसोर्सिंग पद्धतीने भरावयाच्या पदासाठी देय वेतनाची रक्कम काल्पनिक दर्शविली आहे, हे विशेष. इतकेच काय तर प्रथम, द्वितीय मागविताना किती दिवसाचा कालावधी असावा, याबाबत शासनाने स्पष्ट सूचना केल्या आहेत. त्याही मध्यवर्ती संग्रहालयाने पाळलेल्या दिसत नाही.

 

 

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभाग