शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळाचा लूक बदलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 02:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य कॅबिनेटच्या बैठकीनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तारीकरणाचा मार्ग प्रशस्त झाला आहे. खासगीकरणाच्या प्रक्रियेला एप्रिल-२०१८ पर्यंत वेळ लागणार आहे. खासगीकरणानंतर संबंधित कंपनीची भागीदारी ७४ टक्के अणि मिहान इंडिया लिमिटेडची भागीदारी २६ टक्के राहणार आहे. चार वर्षांत १,९८२ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून विमानतळाला आंतराष्ट्रीय लूक येणार आहे.पाच ...

ठळक मुद्देकॅबिनेटच्या मंजुरीनंतर अडथळे दूर : विकासाला मिळेल गती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य कॅबिनेटच्या बैठकीनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तारीकरणाचा मार्ग प्रशस्त झाला आहे. खासगीकरणाच्या प्रक्रियेला एप्रिल-२०१८ पर्यंत वेळ लागणार आहे. खासगीकरणानंतर संबंधित कंपनीची भागीदारी ७४ टक्के अणि मिहान इंडिया लिमिटेडची भागीदारी २६ टक्के राहणार आहे. चार वर्षांत १,९८२ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून विमानतळाला आंतराष्ट्रीय लूक येणार आहे.पाच कंपन्यांच्या निविदा पात्रखासगीकरणाची निविदा मागील वर्षी निघाली. विमानतळाच्या खासगीकरणासाठी पाच कंपन्या पात्र ठरल्या. यामध्ये टाटा रिअ‍ॅलिटी, अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, जीएमआर एअरपोर्ट लि., जीव्हीके, पीएनबी इन्फ्राटेक, एस्सेल इन्फ्रा प्रोजेक्ट लि. या कंपन्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी) खासगी कंपन्यांकडून विमानतळ विकासासाठी नेमक्या आर्थिक खर्चाचा प्रस्ताव अर्थात रिक्वेस्ट फॉर प्रपोजल मागविण्यात येणार आहे. सप्टेंबरमध्ये निविदा आणि त्यानंतर तीन ते चार महिन्यात खासगी कंपन्यांकडून तीन ते चार प्रस्ताव मागविण्यात येणार आहे. जी कंपनी जास्त महसूल देईल, त्या कंपनीकडे खासगीकरणाचे काम सोपविण्यात येणार आहे.चार टप्प्यात विकासविमानतळाचा विकास एकूण चार टप्प्यात एकूण १९८२ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीत करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात १,४२० कोटी, दुसºया टप्प्यात २१० कोटी, तिसºया टप्प्यात २३४ कोटी आणि चौथ्या टप्प्यात ११८ कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. या गुंतवणुकीतून नवीन टर्मिनल व कार्गो क्षेत्र, टॅक्सी-वे, एअरोब्रीज, नवीन धावपट्टी आणि अन्य कामे करण्यात येणार आहे.विमानतळावर नवीन पार्किंग जागासध्या विमानतळावर १७ विमानांच्या पार्किंगसाठी जागा उपलब्ध आहे. खासगीकरणानंतर १६ पार्किंग जागा नव्याने उभारण्यात येणार आहे. जास्तीत जास्त विमान सेवा सुरू होण्यासाठी कंपनीला नव्याने पार्किंग जागा तयार करावी लागणार आहे. खासगीकरणानंतर विमानतळावर मॉल, हॉटेल्स, रेस्टॉरंट आदी सेवा उपलब्ध होईल. ही सुविधा महसूल वाढीसाठी पहिल्याच टप्प्यात कंपनीला उपलब्ध करून द्यावी लागेल.विमानतळाला दरवर्षी तोटाविमानतळाचे संचालन करणाºया मिहान इंडिया लिमिटेडला (५१ टक्के वाटा) दरवर्षी ५६ कोटी रुपयांचा तोटा होत आहे. मर्यादित विमान सेवा आणि कार्गो सुविधा नसल्यामुळे एवढा तोटा सहन करावा लागत आहे. विमान सेवांचा विस्तार झाल्यानंतर तोटा भरून निघण्याची शक्यता आहे.