शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

आकाशवाणीने दिली ओळख

By admin | Updated: October 6, 2015 04:28 IST

देशभरात लाखो उद्घोषक आहेत. मात्र त्यात मला जे स्थान मिळाले, लोकप्रियता मिळाली, ती केवळ आकाशवाणीमुळे.

मैत्री परिवार संस्थेतर्फे आयोजन : किशनजी शर्मा यांचे प्रतिपादन नागपूर : देशभरात लाखो उद्घोषक आहेत. मात्र त्यात मला जे स्थान मिळाले, लोकप्रियता मिळाली, ती केवळ आकाशवाणीमुळे. आकाशवाणीने मला त्या सर्वांपेक्षा वेगळी ओळख दिली, असे प्रतिपादन आकाशवाणीचे प्रसिद्ध उद्घोषक किशनजी शर्मा यांनी केले. मैत्री परिवार संस्थेतर्फे ‘गीतों की बात किशनजी के साथ’ या संगीत मैफलीचे सोमवारी आयोजन करण्यात आले होते. बजाजनगर चौकातील ‘विष्णूजी की रसोई’ येथे हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी व कुंदाताई विजयकर यांच्या हस्ते शर्मा यांना शाल, श्रीफळ व मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी किशनजी शर्मा यांनी उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्या नागपुरातील कार्यक्रमाच्या आठवणींना उजाळा देत, ‘गुंज उठी शहनाई’या चित्रपटातील त्यांच्या शहनाईच्या जादूचा किस्सा सांगितला. तसेच अशोक कुमार यांचे नागपूरशी जुळलेले नाते व त्यांच्या चित्रपट सृष्टीतील प्रवासाची माहिती दिली. यानंतर सुरू झालेल्या संगीत मैफिलीत ते प्रत्येक गाण्यापूर्वी त्या गाण्यामागील विशेष पार्श्वभूमी आपल्या खास शैलीत श्रोत्यांपुढे सादर करीत होते. यामुळे या संगीत मैफिलीला काही वेगळाच रंग चढला होता. कार्यक्रमाला डॉ. पीयूषकुमार, प्रा. संजय भेंडे, विष्णू मनोहर व मंजुषा पांढरीपांडे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रमोद पेंडके यांनी केले. संचालन प्रा. माधुरी यावलकर यांनी करून विजय जथे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)तेरे सुर और मेरे गीत...४प्रसिद्ध गायिका सुरभी ढोमणे यांनी ‘तेरे सुर और मेरे गीत...’ या लोकप्रिय गीताने कार्यक्रमाची सुरुवात केली. यानंतर त्यांनी ‘तूम मुझे भुल भी जाओ..’, ‘चैन से हमको कभी...’, ‘सुन सायबा सुन..’, ‘ये रात भीगी भीगी..’, ‘तोरा मन दर्पण..’, ‘दील दीवाना बीन सजना के..’, ही गाणी सादर केली. तसेच गायक अमर कुलकर्णी यांनी ‘उपर गगन विशाल...’, ‘कभी कभी मेरे दिल मे...’ व ‘गीत नया गाता हु...’ अशा गीतांसह सारंग जोशी यांनी ‘चलो एक बार फीरसे...’, ‘मधुबन मे राधिका...’, ‘आपके हसीन रुख पे...’, ‘दिल दीवाना बीन सजना के..’अशा गीतांनी ही मैफील सजविली होती. या मैफिलीदरम्यान विष्णू मनोहर यांनी अटलजींच्या कवितेचे वाचन केले. कार्यक्रमात वादक म्हणून सचिन ढोमणे, उज्ज्वला गोकर्ण, अमर शेंडे, गोविंद गडीकर, सलील मुळे व नंदु गोहाने यांनी साथ दिली. तर ध्वनी पराग फुसे व इकबाल भाई यांनी मंच सजावट केली होती.