शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

विमानात बॉम्बची अफवा

By admin | Updated: March 23, 2016 02:54 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी सायंकाळी जेट एअरवेजच्या दिल्ली-चेन्नई विमानाची

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी सायंकाळी जेट एअरवेजच्या दिल्ली-चेन्नई विमानाची ‘इमर्जन्सी लँडिंग’ झाल्यानंतर या विमानाची चार तास कसून तपासणी करण्यात आली. संपूर्ण तपासणी केल्यानंतर सुरक्षा यंत्रणेने कोणताच धोका नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर रात्री ८.५० वाजता हे विमान चेन्नईकडे रवाना झाले. बॉम्बची अफवा पसरल्यानंतर हे विमान तातडीने नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरविण्यात आले. विमानतळाच्या डावीकडील ‘आयसोलेशन बे’ मध्ये विमान ठेवण्यात आले. बराच वेळ प्रवाशांना विमानातच बसवून तपासणी करण्यात आली. त्यानंतर प्रवाशांना टर्मिनल बिल्डींगच्या एका भागात बसविण्यात आले. सीआयएसएफ, पोलिसांचे बॉम्ब शोधक व नाशक पथक आणि इतर एजन्सींनी विमान, प्रवासी आणि सामानाची तपासणी केली. चेन्नईसाठी दिल्लीवरून दुपारी ३ वाजता निघालेल्या प्रवाशांना नागपूर विमानतळावर जेट एअरवेजतर्फे चहा आणि नाश्ता पुरविण्यात आला. ‘इमर्जन्सी लँडींग’ झाल्यामुळे प्रवाशात भीतीचे वातावरण होते. याशिवाय विमानाच्या तपासात उशीर होत असल्यामुळे प्रवासी आणखीनच घाबरले. या विमानात (९ डब्ल्यू ८२९) पायलटसह १६१ प्रवाशांचा समावेश होता. विमानाच्या ‘इमर्जन्सी लँडिंग’ दरम्यान नागपूर विमानतळावर कार्यरत संबंधित एअरलाईन्सचे कर्मचारीही हे विमान जाईपर्यंत थांबले होते. नियमित विमानांच्या संचालनासोबत ‘इमर्जन्सी लँडिंग’ झालेल्या विमानातील प्रवाशांची देखभाल आणि त्यांच्या खाण्यापिण्याच्या व्यवस्थेची जबाबदारी या कर्मचाऱ्यांवर होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एअरलाईन्सच्या मुख्यालयातून प्रवाशांची विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. हे विमान चेन्नईकडे झेपावल्यानंतर या कर्मचाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. (प्रतिनिधी)प्रशासन दक्ष४विमानतळावरील सूत्रांनुसार बेल्जियमच्या ब्रुसेल्स विमानतळावर बॉम्बहल्ला झाल्यानंतर जेट एअरवेजच्या काही विमानात बॉम्बची शंका असल्याची माहिती दिल्ली एअर ट्राफिक कंट्रोलने नागपूर ‘एटीसी’ला दिली. सूचना मिळताच नागपूर विमानतळावर त्वरित उपाययोजना करण्यात आली. अग्निशमन विभाग, अभियांत्रिकी शाखेचे कर्मचारी, रुग्णवाहिका आदींची व्यवस्था करण्यात आली. बॉम्बच्या अफवेमुळे विमानातील प्रवाशांसोबतच क्रू मेंबर्सला अतिरिक्त तपासाला सामोरे जावे लागले.