शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

एअर इंडियाच्या विमानानेच होणार हज यात्रा

By admin | Updated: September 9, 2015 03:06 IST

मागील वर्षी हजयात्रेच्या उड्डाणात विलंब होत असल्याच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियातर्फे त्यांचीच विमाने हजयात्रेला जाणार आहेत.

उड्डाणास विलंब न होण्याचा दावा वसीम कुरेशी नागपूरमागील वर्षी हजयात्रेच्या उड्डाणात विलंब होत असल्याच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियातर्फे त्यांचीच विमाने हजयात्रेला जाणार आहेत. नागपूर इम्बार्केशन पॉर्इंटपासून एअर इंडियाचे बोर्इंग ७७७ ईआर विमान हजयात्रींना घेऊन जाणार आहे. दरम्यान, काही अडचण आल्यास मुंबईतही अतिरिक्त विमानाची सोय करण्यात आली आहे. यात्रेत कुठलाही विलंब होऊ नये म्हणून विमान नागपुरात पोहोचले असून, मिहान परिसरातील एअर इंडियाच्या एमआरओत हे विमान ठेवण्यात आले आहे. बुधवारी सकाळी ७ वाजता विमान एअरपोर्ट रनवेकडे टॅक्सी वेमार्गे निघेल. नागपुरात आणण्यात आलेले हे विमान नवे असून कंपनीतर्फे ते युरोपसाठी उड्डाण भरते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर हजयात्रेची संपूर्ण तयारी झाली आहे. ९ सप्टेंबरपासून ही यात्रा सुरू होणार आहे. यासाठी अभियंत्यांची चमू तयार आहे. हजयात्रेसाठी एअर इंडिया दुसऱ्या एअरलाईन्सला कंत्राट देत होती. मागील वर्षी कंत्राट मिळविणाऱ्या दोन एअरलाईन्सची नावेही समोर आली होती. यात पहिल्या फ्लाईटमध्ये तांत्रिक बिघाड असतानाही फ्लाईट रवाना करण्यात आले. बँकॉकमधून विमानाचे सुटेभाग पोहोचू शकले नव्हते. त्यामुळे यात्रेच्या पहिल्या उड्डाणाला सहा तास विलंब झाला. काही वर्षांपूर्वी एअर इंडियाचे ४०० आसनी जम्बो विमानही हजयात्रेसाठी चालविण्यात आले होते. एअर इंडिया आता दुसऱ्या एअरलाईन्सवर विश्वास ठेवण्याच्या मूडमध्ये नसून कुठलीही तक्रार होऊ नये म्हणून प्रयत्नरत आहे.कोचीनवरून येणार विमान ९ सप्टेंबर रोजी नागपुरातून दोन विमाने जाणार आहेत. नागपुरातून जाणाऱ्या भाविकांत १०० यात्रेकरू जास्त आहेत. त्यामुळे कोचीन येथून उड्डाण भरणारे एअर इंडियाचे विमान दुपारी ४ वाजता अतिरिक्त यात्रेकरूंना घेऊन हजला रवाना होणार आहे.