शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

सात कोटी मुलांना हवा आधार

By admin | Updated: September 22, 2014 00:57 IST

देशात एकूण सात कोटी मतिमंद मुले आहेत. आईवडिलांनी वाऱ्यावर सोडल्यामुळे त्यांचा कुणीच वाली नाही. अशा मुलांना एकत्र आणून त्यांच्यासाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्याची आवश्यकता आहे.

शंकरबाबा पापळकर यांचे आवाहन नागपूर : देशात एकूण सात कोटी मतिमंद मुले आहेत. आईवडिलांनी वाऱ्यावर सोडल्यामुळे त्यांचा कुणीच वाली नाही. अशा मुलांना एकत्र आणून त्यांच्यासाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्याची आवश्यकता आहे. त्यांना मायेचा आधार हवा आहे, असे आवाहन अनाथ आणि अपंग मुलांचे पालक शंकरबाबा पापळकर यांनी आज येथे केले.रेड स्वस्तिक सोसायटी नागपूर शाखेतर्फे शुश्रृषा हार्ट केअर सेंटर व मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नेरुळ मुंबईच्या संयुक्त विद्यमाने सुभाष मार्गावरील श्री गुरुदेव सेवा मंडळात आयोजित शस्त्रक्रियापूर्व हृदयरोग तपासणी शिबिरात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर हृदयरोग तज्ज्ञ डॉ. विकास बिसने, डॉ. अश्विन भोसले, अरविंद धजेकर, डॉ. टी. एस. भाल, रेड क्रॉस सोसायटीचे सहसंचालक अशोक शिंदे, माहिती खात्याचे अनिल गडेकर, डॉ. मिलिंद नाईक, डॉ. रोहित कळमकर उपस्थित होते. शंकरबाबा पापळकर यांनी रेड क्रॉस सोसायटीच्या कामाचे कौतुक केले. सोसायटीत अनेक ज्येष्ठ नागरिक असून तडफदार तरुणांनाही सोसायटीत सहभागी करून कार्याला गती देण्याचे आवाहन त्यांनी केले. डॉ. विकास बिसने म्हणाले, हृदयाची शस्त्रक्रिया करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे काम आहे. त्यामुळे अशा शिबिरातून मोफत शस्त्रक्रिया करण्याचे पुण्य मिळते. प्रत्येक कुटुंबाने एका मुलाला दत्तक घेण्याची गरज आहे. तसेच एका डॉक्टरने दररोज एक रुग्ण मोफत केल्यास वर्षाकाठी ३६५ रुग्णांना त्याचा लाभ होणार असल्याचे सांगितले. अरविंद धजेकर यांनी रुग्णांना रांगेत उभे राहून तपासणी करण्याचे आवाहन केले. डॉ. टी. एस. भाल यांनी गोरगरिबांना लाभ व्हावा यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे सांगून शंकरबाबा पापळकर यांच्या कार्याची माहिती दिली. डॉ. अशोक शिंदे यांनी सोसायटीतर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. डॉ. अश्विन भोसले यांनी शुश्रृषा हार्ट केअरतर्फे करण्यात आलेल्या शस्त्रक्रियांची माहिती दिली. आभार डॉ. मिलिंद नाईक यांनी मानले. शिबिराचा रुग्णांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. (प्रतिनिधी)