शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

तंबाखू नियंत्रणासाठी एम्सचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 22:36 IST

तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने वाढते कॅन्सरचे प्रमाण ही चिंतेची बाब आहे. अशा रुग्णांच्या उपचारासह या आजारापासून बचाव व्हावा, यासाठी समाजामध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशासह महापालिका व टाटा ट्रस्टला सहकार्य दर्शवित तंबाखू नियंत्रणासाठी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नागपूर (एम्स) ने पुढाकार घेतला आहे.

ठळक मुद्देमनपा व टाटा ट्रस्टच्या सहकार्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने वाढते कॅन्सरचे प्रमाण ही चिंतेची बाब आहे. अशा रुग्णांच्या उपचारासह या आजारापासून बचाव व्हावा, यासाठी समाजामध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशासह महापालिका व टाटा ट्रस्टला सहकार्य दर्शवित तंबाखू नियंत्रणासाठी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नागपूर (एम्स) ने पुढाकार घेतला आहे.मनपाचा आरोग्य विभाग व टाटा ट्रस्टच्या वतीने शनिवारी मनपातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी तंबाखू नियंत्रणाबाबत क्षमता निर्माण कार्यशाळा एम्सच्या मेजर जनरल डॉ. विभा दत्त यांच्या मार्गदर्शनात सिव्हिल लाईनमधील हॉटेलात आयोजित करण्यात आली. मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, आरोग्य विभाग उपसंचालक डॉ. के.बी.तुमाने, आरोग्य अधिकारी डॉ. सरिता कामदार, अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी आदी उपस्थित होते. उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांना यावेळी एम्सच्या सामुदायिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत मार्गदर्शन करून त्यांच्या शंकांचे समाधान करण्यात आले.संपूर्ण देशासह नागपूर शहरातही तंबाखूजन्य पदार्थांचा प्रभाव वाढत आहे. परिणामी कॅन्सरच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या परिस्थितीमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जागरुक असणे आवश्यक आहे. रुग्णांच्या उपचारासह त्यांचे समुपदेशनही होणे महत्त्वाचे आहे. केवळ रुग्ण बरे करणे हाच उद्देश न ठेवता तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण कमी करण्यासाठी समाजामध्ये जागरूकता निर्माण होणे आवश्यक आहे. यात डॉक्टरांची भूमिका महत्त्वाची असल्याने कार्यशाळा आयोजित करण्यात आली.मोठ्या आजारांसाठी रुग्णांच्या दैनंदिन सवयी कारणीभूत ठरतात. त्यामुळे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या सवयी विचारणे हे डॉक्टरांचे कर्तव्य आहे. मात्र अवघे ५० टक्के डॉक्टरच रुग्णांच्या सवयी विचारून त्याची नोंद घेतात. ही गरज लक्षात घेउन डॉक्टरांनी रुग्णांच्या सवयी विचारून त्या कशा धोकादायक आहेत व सोडविण्यात याव्यात यासाठी समुपदेशन होणे गरजेचे आहे. केवळ उपचार न करता जनजागृती करून व्यसनावर आळा घालण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांना कार्यशाळेमध्ये प्रशिक्षण देण्यात आले.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाdoctorडॉक्टर