शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

‘एम्स’ विमा रुग्णालयात!

By admin | Updated: August 10, 2016 02:16 IST

आयुर्विज्ञान संस्थेसाठी (एम्स) मिहानमधील १५० एकरची जागा केंद्र शासनाच्या आरोग्य व कुुटुंब ...

पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजनेची चमू येणार : सुरुवातीला एमबीबीएसच्या ५० जागा नागपूर : आयुर्विज्ञान संस्थेसाठी (एम्स) मिहानमधील १५० एकरची जागा केंद्र शासनाच्या आरोग्य व कुुटुंब कल्याण मंत्रालयाकडे हस्तांतरित होताच ‘हॉस्पिटल सर्व्हिसेस कन्सलटंसी कॉर्पाेरेशन लिमिटेड’ने, (एचएससीसी) प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात केली आहे. तर, २०१६-१७ या वर्षात ‘एम्स’साठी आवश्यक असणाऱ्या एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाला सुरुवात होणार आहे. त्याकरिता सक्करदरा येथील राज्य विमा मंडळाचे रुग्णालय तर महाविद्यालयासाठी तीन संस्थांवर शोध थांबला आहे. या संदर्भातील अहवाल पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजनेला पाठविण्यात आला असून येत्या १०-१५ दिवसांत त्यांची चमू येण्याची शक्यता आहे. ‘एम्स’ची जागा हस्तांतरित होताच ३० एप्रिलपासून संरक्षण भिंतीच्या कामाला सुरुवात झाली आहे. या प्रस्तावित जागेवर वीज, पाणी व चौपदरी रस्ता उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. यातील अडथळे दूर करण्यासाठी ३ जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. परिणामी, नुकतेच आठ कोटी रुपये मंजूर झाले असून विकासकामाला पाठबळ मिळाल्याचे सूत्राचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, पुढील वर्षीपासून ‘एम्स’ला आवश्यक असणाऱ्या एमबीबीएसच्या प्रथम वर्षाला सुरुवात होणार आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात एमबीबीएसच्या ५० जागा भरल्या जातील. यासाठी रुग्णालय व कॉलेज इमारतीच्या जागेचा शोध नुकताच थांबला आहे. ‘एम्स समन्वय समिती’ने सक्करदरा येथील विमा रुग्णालयाला प्राधान्य दिले आहे. तर कॉलेज इमारतीसाठी एक शासकीय व दोन खासगी संस्थांना पसंती दिली आहे. या संदर्भातील प्रस्ताव पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजनेकडे पाठविण्यात आला आहे. यामुळे येत्या १०-१५ दिवसांत ही चमू येऊन पाहणी करण्याची शक्यता आहे. त्यांच्या निर्णयानंतरच ‘एम्स’ची पुढील वाटचाल ठरणार आहे. (प्रतिनिधी)