शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

२४० एकर जागेवर ‘एम्स’

By admin | Updated: March 20, 2015 02:38 IST

मेडिकलच्या टीबी वॉर्डाच्या जागेला नापसंती देत, मिहानच्या २४० एकरच्या जागेवर अखिल भारतीय आयुर्विज्ञान....

नागपूर : मेडिकलच्या टीबी वॉर्डाच्या जागेला नापसंती देत, मिहानच्या २४० एकरच्या जागेवर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था(एम्स) उभारणीचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. सूत्रानुसार, ही जागा लवकरच ताब्यात घेण्यात येणार असून संरक्षण भिंत टाकण्याच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. केंद्राच्या २२०० कोटी रु पयांचा हा प्रकल्प मेडिकलशेजारी उभा राहणार असल्याची घोषणा केंद्रीय भूपृष्ठ, वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी आॅगस्ट २०१४ मध्ये केली होती. यासाठी मेडिकलच्या टीबी वॉर्डासह, मध्यवर्ती कारागृहामागील जागा, लघु सिंचन विभागाची जागा आणि मेडिकलच्या अजनी रेल्वे स्थानकासमोरील वैद्यकीय वसाहतीची एकूण साधारण २०० एकर जागेवर हा प्रकल्प उभा करण्याचे प्रस्तावित होते. परंतु या जागेवर असलेले विविध विभाग हलविणे खर्चिक आणि वेळखाऊ होते. दरम्यानच्या काळात एम्सच्या अभ्यासक मंडळाने मिहानमधील जागेचाही शोध घेतला. मिहान आणि टीबी वॉर्ड असे दोन्ही ठिकाणी एम्सचा विचार सुरू झाला. याला घेऊन १३ फेब्रुवारी २०१५ रोजी केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव के. सी. सामरीया यांच्या नेतृत्वात चार सदस्यीय पथकाने टीबी वॉर्ड व मिहनमधील जागेची पाहणी केली. या पाहणीत त्यांनी टीबी वॉर्डाच्या जागेला जागेवरच नापसंती दिली. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, पथकाला मिहान येथे प्रस्तावित जागेच्या प्रत्यक्ष ठिकाणावरील जागेच्या मुबलकतेसोबतच वीजपुरवठा, पाणीपुरवठा, रस्ते, हवाई आणि रेल्वेमार्ग उपलब्ध होत असल्याने त्यांनी या जागेला पसंती दिली आहे. लवकरच या संदर्भातील अहवाल समोर येणार आहे. यामुळे येत्या काही दिवसांत जागेचा ताबा आणि येत्या तीन महिन्यात संरक्षण भिंतीचे काम सुरू होण्याची शक्यता आहे.