शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

‘एड्स’ नियंत्रण राबविणारे कर्मचारी कायम सेवेपासून वंचित

By सुमेध वाघमार | Updated: March 31, 2024 20:23 IST

२३ वर्षांच्या सेवेनंतरही राष्ट्रीय आरोग्य अभियनांचा कायम करण्याच्या अधिसूचनेतून डावलले

नागपूर : ‘एड्स’ नियंत्रण व प्रतिबंधासाठी राज्यात दोन हजारांहून अधिक कर्मचारी २३ वर्षांपासून कंत्राटीपद्धतीवर सेवा देत असताना राष्ट्रीय आरोग्य अभियनांचा कायम करण्याच्या अधिसूचनेतून डावलण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांचे भवितव्य टांगणीला लागल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे.

सरकारने १४  मार्च २०२४ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेत राष्ट्रीय आरोग्य अभियानातील (एनएचएम) कंत्राटी कर्मचाऱ्यांचे शासकीय सेवेत समायोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा १० वर्षे किंवा त्याहून अधिक काळ कंत्राटावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. यामध्ये टीबी, कॅन्सर, कुष्ठरोगासह इतर संसर्गजन्य रोगासाठी राबविण्यात येत असलेल्या कार्यक्रम, मोहिम आणि योजनांमधील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

७० टक्के कर्मचाºयांचे ते ज्या पदावर सेवा करत आहेत त्या पदाच्या समकक्ष पदांवर थेट सेवेच्या आधारावर समायोजन होणार आहे. तर, ३० टक्के प्रक्रिया सुधारित सेवा नियमांतर्गत केले जाणार आहे. मात्र, १९९९ पासून कार्यरत असलेल्या एड्स नियंत्रण कार्यक्रमाच्या कर्मचाºयांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे त्यांच्या भविष्याचे काय होणार, असा प्रश्न आहे.

केंद्राने २०१४ मध्ये ‘एनओसी’ दिली होतीमहाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था राज्य सरकारच्या अंतर्गत कार्यरत आहे. या अंतर्गत एड्सच्या नियंत्रणासाठी आणि प्रतिबंधासाठी विविध कार्यक्रम राबवले जातात. राज्यातील ही संख्या दोन हजारांपेक्षा जास्त आहे. तर नागपूर जिल्ह्यात ही संख्या ११० पेक्षा जास्त आहे. सूत्रांनी सांगितले की, २०१४ मध्ये या कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्यासाठी आरोग्य व कुटुंब मत्रालयाच्या एचआयव्ही-एड्स नियंत्रण कार्यक्रम, नॅशनल एड्स नियंत्रण संस्थेने ‘एनओसी’ दिली. परंतु आता नव्या अधिसूचनेत एचआयव्ही-एड्स नियंत्रण कार्यक्रमातील कर्मचाºयांचा समायोजनाचा उल्लेख नाही. याकडे लक्ष वेधण्यासाठी कर्मचाºयांनी महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेचे प्रकल्प संचालक, जिल्हाधिकारी, आरोग्य सेवा मंत्रालयाचे प्रधान सचिव, राष्ट्रीय आरोग्य अभियान आयुक्त कांना निवेदन देवून शासकीय सेवेत समायोजनाची मागणी केली आहे.