मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन : मुख्यमंत्री वसुंधरा राजे विशेष अतिथीनागपूर : विदर्भातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या ‘अॅग्रो व्हिजन’ या राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचे चार दिवसीय आयोजन रेशीमबाग मैदानावर शुक्रवार, ११ डिसेंबरपासून करण्यात येत आहे. उद्घाटन दुपारी ३ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे मुख्य अतिथी तर कृषी व महसूल मंत्री एकनाथ खडसे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील. प्रदर्शनाचे मुख्य प्रवर्तक नितीन गडकरी अध्यक्षस्थानी राहतील. या समारंभात केंद्रीय रसायने व खते राज्यमंत्री हंसराज अहीर, सहकार मंत्री चंद्रकांतदादा पाटील, अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार अजय संचेती, संजय धोत्रे, नानाभाऊ पटोले, रामदास तडस, कृपाल तुमाने, महापौर प्रवीण दटके, जि.प. अध्यक्षा निशा सावरकर, ज्येष्ठ नेते दत्ता मेघे, अॅग्रोव्हिजन सल्लागार समितीचे अध्यक्ष व कृषी शास्त्रज्ञ नेमणूक मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. सी.डी. मायी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहतील. प्रदर्शन १२ ते १४ डिसेंबरपर्यंत दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ७ पर्यंत खुले राहील. केंद्रीय मंत्री राधामोहन सिंग यांच्या हस्ते १२ डिसेंबरला सकाळी ११ वाजता कार्यशाळांचे उद्घाटन होईल. त्यानंतर तीन दिवस शेतकऱ्यांकरिता एकूण ४५ कार्यशाळा होणार असून देशभरातून येणारे ६० तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. प्रयोगशील शेतकरी आपल्या यशोगाथा शेतकऱ्यांना सांगतील. (प्रतिनिधी)
‘अॅग्रो व्हिजन’ राष्ट्रीय कृषी प्रदर्शन आजपासून
By admin | Updated: December 11, 2015 03:44 IST