शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅग्रोव्हिजन ११ नोव्हेंबरपासून

By admin | Updated: October 17, 2016 02:52 IST

शेतकऱ्यांना विविध प्रश्नांवर मार्गदर्शन करणारे, कृषी क्षेत्रात होणारे संशोधन व प्रगतीची माहिती देणारे मध्य भारतातील सर्वात

केंद्रीय मंत्र्यांसह तीन राज्यांचे मुख्यमंत्री येणार नागपूर : शेतकऱ्यांना विविध प्रश्नांवर मार्गदर्शन करणारे, कृषी क्षेत्रात होणारे संशोधन व प्रगतीची माहिती देणारे मध्य भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन ‘अ‍ॅग्रोव्हिजन’ ११ ते १४ नोव्हेंबर दरम्यान रेशीमबाग मैदान येथे आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.गडकरी यांनी सांगितले की, ११ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राहतील. यावेळी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग, उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत, आसामचे मुख्यमंत्री सरबानंद सोनोवाल, केंद्रीय खते व रसायन मंत्री अनंतकुमार, केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर, राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, सहकार मंत्री सुभाष देशमुख, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहतील. १२ नोव्हेंबर रोजी आयोेजित कार्यशाळेचे उद्घाटन केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्या हस्ते होईल. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री विजयभाई रुपानी उपस्थित राहतील. अ‍ॅग्रोव्हिजन फाऊंडेशन, एम.एम. अ‍ॅक्टीव्ह, पूर्ती समूह, एमईडीसी व वेद यांच्यातर्फे दरवर्षी ‘अ‍ॅग्रोव्हिजन’चे आयोजन केले जाते. यंदाचे आठवे वर्ष आहे. गेल्यावर्षी सुमारे ५० लाख शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाला भेट दिली होती. यावर्षी प्रदर्शनात ४०० हून अधिक कंपन्या सहभागी होतील. येथे शेतकऱ्यांना बियाणे, खते, शेती अवजारे, यांत्रिक अवजारे, सिंचनासाठी लागणारे साहित्य, शेड नेट इत्यादीची माहिती मिळेल. कार्यशाळेदरम्यान दुग्ध व्यवसाय, मधमाशी पालन, कुक्कुटपालन, बकरी पालन, रेशीम उद्योग, मत्स्य व्यवसाय, फळ उत्पादन व प्रक्रिया, रोपवाटिका व्यवस्थापन आदी विषयांवर तज्ज्ञांद्वारे माहिती दिली जाईल. यावर्षी १५ नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांसाठी एकदिवसीय अभ्यास ट्रीप आयोजित केली जाईल. याशिवाय एखाद्या व्यक्तीने काही विशेष प्रयोग केले असतील तर त्यांनाही ते दाखविण्यासाठी प्रदर्शनात जागा दिली जाईल. उत्तम प्रयोगाला एक लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. कृपाल तुमाने, ‘अ‍ॅग्रोव्हिजन’ समितीचे सल्लागार अध्यक्ष डॉ.सी.डी.मयी, संयोजक गिरीश गांधी, सचिव रमेश मानकर, रवी बोरटकर, अंकुर सिड्सचे माधवराव शेंबेकर उपस्थित होते. (वा. प्र.)