शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विद्यापीठांना बार्टी फेलोशिपमधून वगळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 08:16 IST

Nagpur News डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट(बार्टी)ने यावर्षी राज्यातील चार कृषी विद्यापीठांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल रिसर्च फेलोशिपमधून वगळले आहे.

ठळक मुद्देअनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांमध्ये रोष

उदय अंधारे

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट(बार्टी)ने यावर्षी राज्यातील चार कृषी विद्यापीठांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल रिसर्च फेलोशिपमधून वगळले आहे. या विद्यापीठांमध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी व बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोली यांचा समावेश आहे. या निर्णयामुळे कृषी विद्यापीठांमधील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांत रोष निर्माण झाला आहे.

बार्टीतर्फे २०१३ मध्ये ही फेलोशिप सुरू करण्यात आली आहे. राज्यातील रहिवासी आणि विविध विद्यापीठांमधील तांत्रिक अभ्यासक्रमात पीएच.डी. करीत असलेले अनुसूचित जातीचे विद्यार्थी या फेलोशिपकरिता पात्र आहेत. बार्टीने गेल्या जानेवारीत जाहिरात प्रकाशित करून ज्युनियर व सिनियर रिसर्च फेलोशिपकरिता अर्ज मागवले आहेत. परंतु, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रँकिंग फ्रेमवर्कद्वारे जाहीर पहिल्या सर्वोत्तम १०० संस्थांमध्ये समावेश नसल्यामुळे राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना या फेलोशिपमधून वगळण्यात आले आहे. असे करताना कृषी विद्यापीठे इंडियन कौन्सिल ऑफ अ‍ॅग्रीकल्चरल रिसर्चद्वारे नियंत्रित केली जातात आणि कौन्सिल त्यांची स्वतंत्र रँकिंग जाहीर करते, या बाबीकडे दुर्लक्ष करण्यात आले, असा या निर्णयामुळे प्रभावित झालेल्या विद्यार्थ्यांचा आरोप आहे.

अ‍ॅग्रीकल्चरल डॉक्टरेट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. रोहित चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, यासंदर्भात ९ मार्च रोजी बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. गजभिये यांनी कृषी विद्यापीठांचा फेलोशिप कार्यक्रमात समावेश करण्याची ग्वाही दिली होती, परंतु पुढे काहीच झाले नाही. याविषयी माहिती घेण्यासाठी गजभिये यांना मोबाईलवर कॉल केला असता, त्यांनी कॉल स्वीकारला नाही.

यावर्षी केवळ २३ पीएच.डी. विद्यार्थी

यावर्षी बार्टीने १०६ विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचे जाहीर केले आहे. त्यातुलनेत कृषी विद्यापीठातील अनुसूचित जातीचे केवळ २३ विद्यार्थी पीएच.डी. करीत आहेत. २०१८ मध्ये समान फेलोशिपकरिता ४०८ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यावेळी प्रवेश परीक्षा न झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी पीएच.डी. करिता नोंदणी केली होती.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र